Sunday, June 29, 2025
spot_img
Homeताज्याए. एस. ट्रेडर्सचा म्होरक्या लोहितसिंग सुभेदार पोलिसांंच्या ताब्यात

ए. एस. ट्रेडर्सचा म्होरक्या लोहितसिंग सुभेदार पोलिसांंच्या ताब्यात

ए. एस. ट्रेडर्सचा म्होरक्या लोहितसिंग सुभेदार पोलिसांंच्या ताब्यात

कोल्हापूर/प्रतिनिधी : ए एस ट्रेडर्सचा म्होरक्या लोहितसिंग सुभेदार पोलिसाच्या ताब्यात सापडला असून शेअर मार्केटच्या माध्यमातून गुंतवणुकीवर मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून हजरो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी
ए एस ट्रेडर्सच्या २८ संचालकावर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यानं हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने ए. एस.ट्रेडर्स आणि संलग्न कंपनीच्या काही संचालकांना ताब्यात देखील घेटले. मात्र याचा मुख्य सूत्रधार आणि अन्य संचालक गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते.दरम्यान मंगळवारी पहाटे ए.एस. ट्रेडर्सचा मुख्य संचालक लोहितसिंग सुभेदार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे..अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
लोहितसिंग सुभेदार आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी मिळून कोल्हापुरात ए. एस. ट्रेडर्स नावाने कंपनी सुरू केली.
गुंतवणुकीवर मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवत राज्यभरातून कोट्यावधी रुपये गोळा केले.मोठ्या गुंतवणुकीवर परदेशवारी आलिशान कार अशा भेटवस्तु देवून लोकांना आकर्षित केले.सुरुवातीला या कंपनीकडून लोकांना दरमहा परतवा देण्यात आला.मात्र २ वर्षापूर्वी परतावा देणे बंद करण्यात आले होते..यावेळी ए. एस. ट्रेडर्सच्या गुंतवणूकदारांनी एकत्र येत २५ नोव्हेंबर २०२२ ला शाहूपुरी पोलिसात लोहितसिंग सुभेदारसह एकूण २८ संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले.
गुन्हा दाखल झाल्यापासून सुभेदारसह सर्व संचालक पसार झाले त्यांनी जिल्हा तसेच उच्च न्यायालयात अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील केला.मात्र जामीन नाकारल्याने ते पोलिसांना गुंगारा देवून पसार झाले होते.पण आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ए.एस.ट्रेडर्स आणि संलग्न कंपनीचे संचालक आणि एजंट अशा एकूण ८ जणांना जेरबंद केले.दरम्यान ए. एस. ट्रेडर्सचा प्रमुख संचालक लोहितसिंग सुभेदार गेल्या वर्षभरापासून व्हिडिओ आणि ऑडिओ मेसेज वरून लोकांना
कंपनी परत सुरू करणार असल्याचे सांगत पुन्हा लोकांचा विश्वास संपादन करत होता.दरम्यान आज पहाटे ए. एस.ट्रेडर्स चा मुख्य संचालक लोहितसिंग सुभेदार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. याबाबत अधिक तपास समजू शकलेला नाही आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments