Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्यागोकुळ ची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

गोकुळ ची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

गोकुळ ची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

कोल्‍हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,(गोकुळ) ची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज शुक्रवार दिनांक-१५/०९/२०२३.इ.रोजी महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना पंचतारांकित औद्योगिक वसाहत,कागल येथील कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेचे स्वागत व प्रास्ताविक संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले, सभेचे नोटीस वाचन व अहवालातील १ ते १३ विषय वाचन कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी केले. तर आभार संचालक शशिकांत पाटील–चुयेकर यांनी मानले.
तसेच या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी संघाच्‍या दूध उत्‍पादक यांना संघाच्‍या विविध योजनाची माहिती होण्‍यासाठी वैरण विकास विभाग, दूध संकलन विभाग, महिला नेतृत्‍व विकास, मिल्‍को टेस्‍टर विभाग, मार्केटिंग विभाग, पशुसंवर्धन विभाग,मिल्क कुलर विभाग,सेंद्रिय खते विभाग, इत्‍यादी विभागानचे स्‍टॅाल संघाच्‍या वतीने लावण्‍यात आले होते. त्‍याचे उद्घाटन मान. नामदार हसन मुश्रीफसो (कॅबिनेट मंत्री, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य), आमदार सतेज पाटीलसो (मा.गृहराज्यमंत्री,महाराष्ट्र राज्य), माजी आमदार के.पी.पाटील,यांच्‍या हस्‍ते व संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक विश्वास पाटील,व सर्व संचालक यांच्‍या उपस्थित करण्यात आले.
यावेळी मान. नामदार हसन मुश्रीफसो (कॅबिनेट मंत्री, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य), आमदार सतेज पाटीलसो (मा.गृहराज्यमंत्री,महाराष्ट्र राज्य), माजी आमदार के.पी.पाटील, संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, के.डी.डी.सी बँक संचालक प्रताप उर्फ भैय्या माने व मार्केट कमिटीचे चेअरमन भरत पाटील, के.डी.डी.सी बँक संचालिका स्मिता गवळी संघाचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments