देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : थोर स्वातंत्र्यसेनानी, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, पद्मश्री डॉ.रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या ११४ व्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी १९५१ साली स्थापन केलेल्या कौन्सिल ऑफ एज्युकेशन या संस्थेमार्फत शहाजी लॉ कॉलेज, डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्स व नाईट कॉलेज ही महाविद्यालये चालवली जातात . या महाविद्यालयांमध्ये रत्नाप्पाण्णांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
शहाजी लॉ कॉलेजमध्ये सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत रत्नाप्पाण्णांच्या प्रतिमेचे पूजन , संविधान सभेतील रत्नाप्पाण्णांच्या फोटोचे अनावरण , महिला कक्षाचे उद्घाटन, ग्रंथ प्रदर्शन व विद्यार्थ्यांना ग्रंथांचे वितरण, विविध स्पर्धामधील विजेत्यांना पारितोषिक वितरण असे कार्यक्रम होणार आहेत .देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये रत्नाप्पाण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण, पोस्टर प्रदर्शन, रक्तदान शिबिर, श्री किशोर बेडकीहाळ यांचे ‘ भारतीय लोकशाहीची बदलती रूपे ‘ या विषयावर व्याख्यान, विविध स्पर्धामधील विजेत्यांना पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत . हे सर्व कार्यक्रम सकाळी साडेआठ ते साडेबारा या वेळेमध्ये संपन्न होणार आहेत .
नाइट कॉलेजमध्ये प्रश्नमंजुषा,वक्तृत्व ,निबंध, रांगोळी, भित्तीपत्रक लेखन,पोस्टर प्रदर्शन,विवेक वाहिनी उद्घाटन, रिंगणनाट्य अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी ‘विवेकी व्यक्तिमत्व विकास ‘ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विवेक वाहिनी, डी आर . के .कॉलेज ऑफ कॉमर्स आणि नाइट कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे . या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील शंभरहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत .या कार्यशाळेचे उद्घाटन कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव विश्वनाथ मगदूम यांच्या हस्ते होणार असून डॉ बी . एम .हिर्डेकर हे मार्गदर्शन करणार आहेत .
वरील कार्यक्रमास कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ रजनीताई मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, उपाध्यक्ष डॉ .प्रसाद मगदूम, संचालक अँड . वैभव पेडणेकर, अँड. अमित बाडकर हे उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास विद्यार्थ्याबरोबर पालक व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन डी . आर . के . कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ .व्ही ए पाटील , शहाजी लॉ कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ प्रवीण पाटील व नाइट कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ एस जे फराकटे यांनी केले आहे .