Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्याचैतन्य यादव मुलाचा डेंग्यू सदृश्य ताप व शॉक सिंड्रोमने मृत्यू

चैतन्य यादव मुलाचा डेंग्यू सदृश्य ताप व शॉक सिंड्रोमने मृत्यू

चैतन्य यादव मुलाचा डेंग्यू सदृश्य ताप व शॉक सिंड्रोमने मृत्यू

मृत्यूच्या चौकशीसाठी चार सदस्यीय चौकशी समिती गठीत

कोल्हापूर, दि.१९ (जिमाका) : राजेंद्र नगर, कोल्हापूर येथील चैतन्य यादव, वय वर्ष १२ रा. हा मुलगा सावित्रीबाई फुले महानगरपालिका रुग्णालय, कोल्हापूर येथून संदर्भ सेवेने छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील बालरोग विभागाच्या अतिदक्षता कक्षात दि. १९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.१५ च्या सुमारास ताप, उलट्या, जुलाब आणि धाप लागलेल्या अवस्थेत दाखल झाला होता. रुग्ण तपासणीनुसार मुलास श्वसनाचा गंभीर आजार असून रुग्ण अत्यवस्थ होता. त्याच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ७० टक्केच्या आसपास होते. त्यामुळे रुग्णास आवश्यक सलाईन आणि ऑक्सिजन मास्क द्वारे स्थिर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, सकाळी १०.४५ च्या सुमारास रुग्णाचा श्वास मंद होऊ लागल्याने कृत्रीम श्वाच्छोश्वास देऊन उपचार करण्यात आले. परंतु, रुग्णाने उपचारास प्रतिसाद दिला नाही आणि दुपारी १२ च्या आसपास रुग्ण मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. तपासणी नुसार रुग्णाच्या प्लेटलेट पेशी केवळ ३६ हजार असल्याचे आढळून आले आहे. रुग्णाचे प्राथमिक रोग निदान डेंग्यू सदृश्य ताप आणि शॉक सिंड्रोम असे ठेवण्यात आले आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी मृतदेहाची शवचिकित्सा न्यायवैद्यकीय तज्ञांच्या
मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात उपचारा दरम्यान निष्काळजीपणा झाल्याबाबत अधिष्ठाता यांच्याकडे तक्रार सादर केल्याने मृत्यूच्या चौकशीसाठी चार सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती राजषी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments