उपमुख्यमंत्री अजित दादा पवार कोल्हापुरात या …पण एकटे येऊ नका येताना सोबत महापालिकेला आयुक्त घेऊनच या – कोल्हापूर शहर व जिल्हा नागरीकृती समिती
कोल्हापूर : आपण स्वतः स्वतंत्र दिनाचा ध्वजवंदन करण्यासाठी आमच्या राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूरची निवड केलीत त्याबद्दलआपणास धन्यवाद
कोल्हापूर महानगरपालिकेला दि २ जून २० २३ पासून राज्य शासनाने आयुक्त दिलेला नाही. त्यामुळे येथील प्रशासकीय कामांचा खोळंबा होऊन दैनंदिन विकास कामावर त्याचा परिणाम होत आहे. याबाबत आम्ही गेली दीड महिना मा .मुख्यमंत्री मा .उपमुख्यमंत्री ‘ मा .केंद्रीय मंत्री यांचे कडे वारंवार लेखी ‘तोंडी ‘ ई .दिल द्वारे आयुक्त देण्याची मागणी करीत आहोत पण का कोणास ठाऊक शासन कोल्हापूरला आयुक्तच देत नाही आयुक्त देणे ही काही विशेष बाब नाही हा शासनाचा नियमित कामाचा भाग आहे शासन अशा या आयुक्त नियुक्ती करण्यासारख्या मूलभूत सुविधा देत नसेल तर मग तुमच्या ‘ वेगवान .शासनाकडून आम्ही विकास कामाच्या काय अपेक्षा ठेवायच्या ?
आमच्याकडे असणाऱ्या तीन खासदार ‘तेरा आमदार पैकी एक कॅबिनेट मंत्री ‘एक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष ‘शिवाय आम्ही तुमच्या पुण्यास दिलेले एक दत्तक आमदार तथा कॅबिनेट मंत्री अशा एकूण १९ लोकप्रतिनिधींनीयासाठी शासनाकडे पाठपुरावा केला नसेल काय ? जर केलाच असेल तर मग राज्य शासन आमच्या या लोकप्रतिनिधींना किंमत देत नाही काय ? अशी आम्हाला शंका आहे .
शासन आयुक्त देत नाही आणि आमचे लोकप्रतिनिधी या विषयात लक्ष घालत नाहीत म्हणून आम्ही १५ ऑगस्टनंतर लोकप्रतिनिधींच्या घरा समोर बोंब मारून आंदोलन करणार आहोत हे आम्ही आगाऊ जाहीर केले आहे
आम्हाला आपल्या धडाकेबाज कामाचा अनुभव आहे म्हणूनच आपण आमच्या शाहूनगरीत स्वातंत्र्य दिनाचा ध्वजवंदन करायला येत आहात तर आपले स्वागतच आहे पण येताना एकटे येऊ नका सोबत महापालिकेसाठी आयुक्त घेऊनच या
आणि गेली दोन महिने १३ दिवस कोल्हापूर महानगरपालिकेला आयुक्त नाही हा मोठा इतिहास होणार आहे . आयुक्त न देणे या मागची शासनाची भूमिका आपण जाहीर रित्या स्पष्ट करावी ही आपणास विनंती आहे.असे कोल्हापूर शहर व जिल्हा नागरीकृती समितीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन पाठविले आहे.