Sunday, June 29, 2025
spot_img
Homeताज्यादि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, मुलांचे बालगृह राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची...

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, मुलांचे बालगृह राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, मुलांचे बालगृह राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी

कागल/प्रतिनिधी : दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, मुलांचे बालगृह, कागल मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराज मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष, श्री. दस्तगीर मुल्ला उपस्थित होते. त्यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक अधीक्षक, श्री. बाबू साळुंखे यांनी केले. यावेळी बालगृहातील प्रवेशितांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रमुख अतिथी यांनी प्रवेशितांना बहुमोल मार्गदर्शन केले. वाय. डी. माने बालगृहाच्या अधिक्षिका, सौ. ए. के. कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास संस्थेतील कर्मचारी वर्ग आणि प्रवेशित उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी श्री. मुल्ला यांचे मार्फत प्रवेशितांना फळे वाटप करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments