Thursday, November 21, 2024
Home ताज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम

जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण-जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची माहितीकोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम मंगळवार दिनांक 13 जून रोजी सायंकाळी 4.30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तपोवन मैदानावर होणार असून कार्यक्रमासाठी 28 हजार 640 लाभार्थी उपस्थित राहतील. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने चोख नियोजन करण्यात आले असून कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.’शासन आपल्या दारी’ कोल्हापूर जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील 1227 गावांमधून 28 हजार 640 लाभार्थी 716 बसमधून आणण्याचे नियोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात सर्व तालुक्यातील लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी बहुपीक मळणी यंत्र, शेंगा फोडणी यंत्र, डिझेल पंप, स्प्रे पंप, ट्रँम्पोलीन, शिलाई यंत्र, वॉशिंग मशिन, व्हिलचेअर, लेबर सेफ्टी किट, पॉवर टिलर, ट्रक्टर, पॉवर विडर आदी साहित्यांचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे.तपोवन मैदानावर सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तर कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने पंडीत दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचेही सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात 1800 हून अधिक रिक्त पदांसाठी 18 कंपन्या सहभागी होणार आहेत. याचा लाभ इच्छुकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.प्रशासनाच्या वतीने लाभार्थ्यांना बसेसद्वारे कार्यक्रम स्थळी आणणे, पुन्हा त्यांच्या गावी पोहोचवणे, त्यांना पाणी, ओआरएस पॅकेट, नाश्ता व भोजन देण्यात येणार आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यासपीठ व्यवस्था, उपस्थित नागरिक, लाभार्थी, पत्रकार, मान्यवरांची बैठक व्यवस्था, शासकीय योजनांचा माहिती कक्ष, वैद्यकीय कक्ष आदी कक्ष तयार करण्याबरोबरच त्या-त्या कक्षांचे माहितीफलक दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. याठिकाणी पाणीपुरवठा, फिरते स्वच्छतागृह, रुग्णवाहिका ठेवण्‍यात आल्या आहेत. तसेच लाभार्थी व नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले असून कार्यक्रमाची माहिती देणारे बॅनरही विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments