Sunday, June 29, 2025
spot_img
Homeताज्याराज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शिवसेना बांधकाम कामगार...

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या पाठपुराव्यातून मंजूर धनादेशाचे लाभार्थ्यांना वाटप

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या पाठपुराव्यातून मंजूर धनादेशाचे लाभार्थ्यांना वाटप

कोल्हापूर/प्रतिनिधी : दुसऱ्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यात बांधकाम कामगार महत्त्वाची भूमिका बजावतात. अगदी प्रधानमंत्री आवास योजनेतून कित्येकांची घरकुले त्यांनी उभारली. पण, बांधकाम कामगारांना स्वत:चे घरकुल उभारणीसाठी अनुदानाची प्रतीक्षा होती. अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत बांधकाम कामगारांनाही स्वत:चे घर बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करण्यात आले आहे. शिवसेना अंगीकृत असंघटीत महाराष्ट्र बांधकाम कामगार सेना बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असून, या संघटनेच्या पाठपुराव्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना घरकुलासाठी मंजूर झालेल्या धनादेशाचे वाटप राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात करण्यात आले. त्याचबरोबर नैसर्गिक मृत्यू झालेल्या बांधकाम कामगारांच्या वारसांना मंजूर मदतीचे वाटपही यावेळी करण्यात आले. यावेळी शिवसेना – भाजप युतीचे शासन बांधकाम कामगारांच्या पाठीशी ठाम उभे असून, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर राजेश क्षीरसागर यांनी दिली. यानंतर श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते अटल बांधकाम कामगार घरकुल योजनेतून घरकुलासाठी पात्र ठरलेल्या गोरखनाथ शंकर नलवडे, दिपाली सुनील धुमाळ, आनंदा नामदेव चव्हाण, मानसिंग राजाराम पाटील, विजय रामचंद्र यादव यांना प्रत्येकी १.५० लाख यासह नैसर्गिक मृत्यू झालेल्या बांधकाम कामगारांचे वारस मंगल सुरेश हल्ले, शोभा विश्वास कांबळे, भगवान रामचंद्र पलसे यांना प्रत्येकी रु.२ लाख अशा धनादेशाचे वाटप करण्यात आले.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, तालुकाप्रमुख बिंदू मोरे, शिवसेना अंगीकृत बांधकाम कामगार संघटनेचे सुहास साका, सचिन पाटील, मेघा चव्हाण आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments