कु.अक्षय अशोक नेर्ले भारत सरकार द्वारे घेण्यात येणाऱ्या संघ लोक सेवा आयोग ( UPSC )परीक्षेत उत्तीर्ण
कोल्हापूर/प्रतिनिधी : कु.अक्षय अशोक नेर्ले यांची भारत सरकार द्वारे घेण्यात येणाऱ्या संघ लोक सेवा आयोग ( UPSC )परीक्षेत CSE 2022 ALL INDIA RANK -635 ने उत्तीर्ण झाला आहे, दत्तवाड गावातील UPSC परीक्षा पास होणारा तो पहिलाच विदयार्थी आहे, दोनवेळा परीक्षेत अपयश येवून खचून न जाता तिसऱ्यावेळी तयारी करून त्यांनी कोणतेही कोचिंग क्लासेस न लावता हे घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुमार विद्या मंदिर दत्तवाड येथे झाले असून माध्यमिक शिक्षण नेजे हायस्कूल दत्तवाड येथे झाले आहे, त्याने संजय घोडावत इंजिनीरिंग कॉलेज मधून BE Mechanical हि पदवी घेतली आहे. त्यांचे वडील श्री अशोक नेर्ले हे माजी सैनिक आहेत.