माजी उपमुख्यमंञी मा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा संपन्न
डाॅ आशा शितोळे यांना एनसीपी, डॉकटर्स सेल डिस्ट्रिक्ट वूमेन इनचार्ज पोस्ट ऑर्डर हँड ओव्हर
कोल्हापूर/प्रतिनिधी : माजी उपमुख्यमंञी आणि नेते मा अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नेते मा आम हसनसो मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावा शनिवार दि २० मे २०२३ रोजी धैर्यप्रसाद हाॅल,ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे संपन्न झाला. यावेळी मान्यवर नेतेगण व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी मा.अजीत पवार यांच्या हस्ते डाॅ आशा शितोळे यांना NCP Doctors cell District Women Incharge Post Order Hand over करण्यात आली.जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य आणि पदाधिकारी, जिल्हा सेलचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी, विधानसभाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी, नगरपालिका क्षेञ शहराध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी, सहकारी संस्थांचे संचालक व पदाधिकारी,जि.प/पं.स सदस्य व पदाधिकारी, नगरपालिका नगरसेवक व पदाधिकारी हे आपल्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.