Monday, June 30, 2025
spot_img
Homeताज्यालोककलाकारांनी कलेतून वाहिली लोकराजाला आदरांजली - शाहू मिलमध्ये लोककलांचा कार्यक्रम सादर

लोककलाकारांनी कलेतून वाहिली लोकराजाला आदरांजली – शाहू मिलमध्ये लोककलांचा कार्यक्रम सादर

लोककलाकारांनी कलेतून वाहिली लोकराजाला आदरांजली – शाहू मिलमध्ये लोककलांचा कार्यक्रम सादर

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराजांच्या १०१ व्या स्मृती दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने शाहू मिलमध्ये कलारसिकांसाठी गोंधळ, जागरण, शाहिरी असा एकत्र कार्यक्रम सादर करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमात लोककला म्हटलं की गोंधळ, जागरण, शाहिरी असे कलाप्रकार व्यावसायिक कलाकारांकडून सादर केले जातात. पण कित्येक पिढ्या लोककलांची जपणूक केलेल्या लोककलावंतांच्या
रचना, वाद्य, तालाचा आस्वाद शाहू मिलमध्ये कलारसिकांना घेता आला.
विविध कला जोपासत कलाकारांना राजाश्रय देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी कोल्हापुरातील लोककलाकारांनी
गोंधळ, जागरण, भेदिक शाहिरी भारुड, धनगरी ओवी यांच्या माध्यमातून, संबळ, तुणतुणं दिमडी, घाटी, सुती, चौंडक, डौर, डफ, ढोल अशा पारंपारिक वाद्यांच्या तालावर लोककलांचा कार्यक्रम पार पडला. यात तोडा, गण, वाघ्या, मुरळी, डवरी गीते, गोंधळ, धनगरी ओवी, शाहीरी गीते, यल्लमा गीते, भारुड, भैरवी आदी कार्यक्रम सादर झाले.
श्रीधर गोंधळी यांचा जय भवानी गोंधळ ग्रुप, कोल्हापूर, शाहीर केरबा बाळू खोत व पार्टी, घुंगर ता.शाहूवाडी, भेदीक शाहीर, शाहिर प्रकाश सुतार, धामोड ता. राधानगरी, भेदीक शाहीर तानाजी बडेकर आणि मंडळी, अमोल बुचडे आणि मंडळी, संग्राम जाधव आणि मंडळी, धोंडीराम जाधव आणि मंडळी आदी कलाकारांनी कला प्रकार सादर केले. कार्यक्रमाचे निवेदन प्रसन्न मालेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments