मतपत्रिकेतून समोर येत आहेत सभासदांच्या चिठ्ठ्यामधून भावना
कोल्हापूर/प्रतिनिधी : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आज रमनमळा येथे सुरू असून ही मतमोजणी करत असताना सभासदांनी आपल्या मतपत्रिकेतून प्रतिक्रिया चिठ्ठ्या पद्धतीने ठेवल्या आहेत.या मतपत्रिका पाहत असताना या चिठ्ठ्या समोर येत आहेत आणि या चिठ्यांद्वारे सभासदांनी आपली वेगवेगळी मते मांडली आहेत.जी या कारखान्याच्या निमित्ताने जे काही राजकारण सुरू आहे त्या राजकारणाच्या बाबतीत सभासदांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.