जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर शिवसमर्थचा शपथविधी आणि पदार्पण सोहळा संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर शिवसमर्थ चा शपथविधी आणि पदार्पण सोहळा दिनांक २३ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सेंट्रल कमिटी मेंबर मा.डाॅ. अनिल माळी, माजी फेडरेशन अध्यक्ष डाॅ राजकुमार पोळ , डाॅ सुवर्णा माळी, स्पेशल कमिटी मेंबर माननीय म॔गलाताई कुलकर्णी,फेडरेशनचे उपाध्यक्ष रामदासजी रेवणकर, नुतन स्पेशल ऑफिसर डाॅ शरदचंद्ररजी दिवाण,फॉर्मर स्पेशल ऑफीसर प्रकाश क्षीरसागर , युनिट डिरेक्टर सुरेश खांडेकर, प्रो. महादेव शिंदे, फेडरेशन ऑफीसर सुरेखा गुप्ते, बबिता जाधव, डाॅ आशा शितोळे, सुषमा पोळ, सहेली गृपच्या माजी अध्यक्षा सोनकरंबळे .तसेच सिटी गृप चे उपाध्यक्ष सुभाष भाट ,शिवसमर्थ ग्रूपचे कार्यवाह डॉ अक्षरा शितोळे ,उपाध्यक्ष शीतल शितोळे,फेडरेशन ऑफिसर
सदस्य रिटायर्ड आर्मी ऑफिसर एन एन पाटील सर,संकल्प महेता,डॉ सुनीता महाडेशवर ,आरती जाधव मॅडम आणि इतर सद्स्य उपस्थित होते. तसेच शिवरागिणी गृप च्या अध्यक्षा तेजस्विनी पाटें, सेक्रेटरी रुपाली तोडकर, माजी अध्यक्षा शितल पंदारे उपस्थित होते. जायंट्स च्या नियमाप्रमाणे शपथविधी संपन्न झाला. नुतन अध्यक्ष संदिप कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. नंतर ग्रुप मधील उत्कृष्ठ काम करणारे सदस्यांचे सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे सिटी ग्रुपचे उपाध्यक्ष सुभाष भाट याना बेस्ट सिंगर इंटरनॅशनल अँवार्ड मिळालेबद्दल त्यांचा ही सत्कार करण्यात आला. तसेच सिटी ग्रुप सेवा दवाखान्या साठी गुकोमीटर ग्रुप तफेँ भेट दिला.तसेच मान्यवरांनी उत्कृष्ठ माग॔दश॔न केले. सुत्रसंचालन प्रो. आरती चौगुले यांनी केले. आभार सांगता डाॅ आशा शितोळे यांनी मानले.