आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषकचा मानकरी मोगणे क्रिकेट क्लब
टी-२० क्रिकेट स्पर्धा : पोलाईट क्लब उपविजेता
कोल्हापूर/प्रतिनिधी : कै. आण्णा मोगणे क्रिकेट क्लब, कोल्हापूर संघाने पोलाईट क्रिकेट क्लब, सांगलीचा ४४ धावांनी पराभव करत आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक पटकावला. शांद फाऊंडेशन व परिवहन कल्चर स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्यावतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. बक्षीस वितरण कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक संभाजी जाधव, गोकुळचे संचालक एस. आर. पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, सुरेश ढोणुक्षे, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव केदार गयावळ, रणजित इंदुलकर, रघुनाथ पिसे यांच्या हस्ते झाले.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आण्णा मोगणे क्रिकेट क्लबने वीस षटकात १२५ धावा केल्या. यामध्ये सिराज चव्हाण हे १४ चेंडू ३ तर विवेक पाटीलने 38 धावा केल्या. सुशिल बुर्लेने तीन बळी घेतले. उत्तराधखल सांगली संघ १८.३ षटकात ८१ धावात गारद झाला. गणेश कुकडे ने 27 धावा केल्या, स्मित पाटील तीन बळी घेतले. मोगणे क्लबने ४४ धावांनी विजय मिळवत, आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषकावर नाव कोरले.
स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ओंकार यादव (पोलाईट क्लब),
उत्कृष्ट गोलंदाज सुयश कुलकर्णी (पोलाईट क्लब), मालिकावीर शुभम माने (मोगणे क्लब), अंतिम सामन्यातील सामनावीर स्मित पाटील (मोगणे क्लब).
यावेळी काका पाटील, शांद फाऊंडेशनचे मधू बामणे, अनिल शिंदे, राजू भोसले, विक्रम जाधव, विजय कोंडाळकर, रोहीत पाटील, राजाराम कुलकर्णी, आनंद छाजड, विजय बक्षी, नंदू बामणे, सुनिल शिंदे, प्रकाश माजगावकर, मुकुंद यादव, प्रभाकर यादव, दिनकर भोसले, विजय भणगे, रामभाऊ करपे यांच्यासह क्रिकेट प्रेमी नागरिक व खेळाडू उपस्थित होते.
प्रस्तावना अनिल शिंदे यांनी केले. आभार मधू बामणे यांनी मानले.
—
चौकट
ज्येष्ठ क्रिकेटपटू व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांचा यावेळी मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.