Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्या'भारतीय शिक्षणाचा अभिमान बाळगा' - डाॅ. अनिल सहस्रबुद्धे

‘भारतीय शिक्षणाचा अभिमान बाळगा’ – डाॅ. अनिल सहस्रबुद्धे

‘भारतीय शिक्षणाचा अभिमान बाळगा’ – डाॅ. अनिल सहस्रबुद्धे

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निक येथील कार्यक्रमात ते बोलत होते. डाॅ. अनिल सहस्रबुद्धे हे नॅशनल ॲसेसमेंट ॲन्ड ॲक्रिडिटेशन कौन्सिल (नॅक) आणि नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरमचे चेअरमन आहेत तसेच ते अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे माजी चेअरमन होत.डाॅ. अनिल सहस्रबुद्धे यांनी ‘शिक्षणाचा भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भारताच्या प्राचीन काळापासून ते आतापर्यंतच्या शैक्षणिक पद्धतींचा आढावा घेतला. प्राचीन काळात जगभरातील पहिले १७ मानांकित विद्यापीठे ही भारतातीलच होती आणि भारताला उच्च दर्जाच्या शिक्षण पद्धतीचा गौरवशाली इतिहास आहे हे नमुद केले. त्या शिक्षण पद्धतीमुळेच भारत जगामध्ये व्यापार, नीतिमत्ता, मानवता आदी बाबतीत अव्वल होता. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये भारताच्या याच शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला आहे. समाजातील सर्वच घटकांना शिक्षण देताना लवचिक धोरण अवलंबले आहे. मातृभाषेतून शिक्षण, ॲकॅडेमिक बॅन्क ऑफ क्रेडीट (एबीसी), मल्टीपल एन्ट्री / मल्टीपल एक्झीट, विविध आवडीच्या क्षेत्रातील शिक्षण घेण्याची मुभा ही या शैक्षणिक धोरणाची बलस्थाने आहेत. एखाद्या क्षेत्रातील सखोल शिक्षण घेत असतानाच त्या विद्यार्थ्यास इतरही पुरक शाखांमधील जुजबी ज्ञान व कौशल्ये आत्मसात असणे कामाची गरज आहे. या धोरणातील ‘एबीसी’ मधून विद्यार्थ्याचा बायोडाटा आपोआपच तयार होणार आहे.
याचवेळी त्यांनी शिक्षकांनाही मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास मोकळीक द्या, स्वतःला माहिती व कौशल्याने अद्ययावत ठेवा, सातत्याने शिकत रहा, इंडियन नाॅलेज सिस्टीममधील प्रामाणिकपणा व अखंडता या मुल्यांवर भर द्या, इंटरनेटचा प्रभावी वापर करा, विद्यार्थ्यांच्या इतर क्षेत्रातील कौशल्यांनाही प्रोत्साहन द्या.
याप्रसंगी त्यांनी न्यू पॉलिटेक्निकमधील नूतन संगणक कक्ष आणि सर विश्वेश्वरय्या हाॅलचे उद्घाटन केले. त्याचबरोबर ‘डिजीफेस्ट’ या नॅशनल टेक्निकल सिंपोझियमच्या मुखपत्राचे प्रकाशन केले. संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील यांनी डाॅ. अनिल सहस्रबुद्धे यांचा सत्कार केला. यावेळी संचालिका सौ. सविता पाटील, प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे, न्यू काॅलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डाॅ. रविंद्र कुंभार, रजिस्ट्रार प्रा. नितीन पाटील, न्यू पॉलिटेक्निकमधील विभागप्रमुख, स्टाफ व विद्यार्थी उपस्‍थित होते. सूत्रसंचालन प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments