आमदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त बाल संकुल मधील मुलांना भोजनाचा कार्यक्रम
कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार हसन मुश्रीफ यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त नंगीवली चौक, मंगळवार पेठ, येथील शासकीय बाल संकुल गृहातील मधील मुलांना भोजन वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व्ही बी पाटील व शहराध्यक्ष आर के पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते व्यंकाप्पा भोसले, पद्मजा तिवले, सुनील देसाई, जयकुमार शिंदे,व संस्थेची कर्मचारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते