Wednesday, June 25, 2025
spot_img
Homeताज्यानेहरुनगर विद्यालयात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यशाळा संपन्न

नेहरुनगर विद्यालयात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यशाळा संपन्न

नेहरुनगर विद्यालयात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर /प्रतिनिधी : महानगरपालिका नेहरूनगर विद्यालयात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. कार्यशाळेत सहावी ते सातवीचे 225 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेच्या आयोजन सौ. माया रणवरे अध्यक्षा असोसिएशन ऑफ पीपल अफेक्टेड बाय लेप्रसी यांनी केले. आरोग्य पर्यवेक्षिका सौ.वंदना कुरुंदवाडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यांनी कुष्ठरोग निर्मूलनाचा उद्देश सांगितला व कुष्ठरोगांची लक्षणे पीपीटी द्वारे समजावून दिले.याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली.
बहुविध औषध उपचाराने कुष्ठरोग निश्चित बरा होतो.वेळीच औषधे घेणे आवश्यक असल्याचे नमूद केले.सर्व मुलांना डायरी व खाऊचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
कुष्ठरोगी रुग्ण आढळल्यास त्याची माहिती द्यावी आपल्या संस्थे मार्फत व शासनाच्या वतीने त्यांना भरीव मदत व विनामूल्य औषधे मिळवून देत असल्याचे सौ.माया रणवरे यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते श्री जगमोहन भुर्के होते.
जगमोहन भुर्के यांनी आपल्या मनोगतात माया रणवरे यांनी कुष्ठरोग बांधवांसाठी भरीव काम केल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव केला व कुष्ठरोग रुग्णांसाठी कोणतीही मदत लागल्यास आपण त्यात निश्चित पुढाकार घेऊ असे सांगितले.या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी साळुंखे संजय पाटील,लेप्रसी असोसिएशनच्या अध्यक्षा माया रणवरे ,संजय पाटील ,वंदना कुरुंदवाडे ,वैष्णवी रणवरे,अमृता खुडे,शुभांगी गुरव,सविता जमदाडे,मनाली सातोसे,जयश्री आवळे,सुप्रिया सदरे,राजश्री पोळ,पल्लवी लाड,रुपाली हावळ आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापिका नलिनी साळुंके मॅडम यांनी केले तर आभार सरिता कांबळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments