Tuesday, July 1, 2025
spot_img
Homeताज्याभारतीय स्वातंत्र्याचा लढा आणि युवक' या विषयावर स्वामी अभिषेक ब्रह्मचारी आणि रोहित...

भारतीय स्वातंत्र्याचा लढा आणि युवक’ या विषयावर स्वामी अभिषेक ब्रह्मचारी आणि रोहित कुमार सिंह यांचे आज व्याख्यान 

भारतीय स्वातंत्र्याचा लढा आणि युवक’ या विषयावर स्वामी अभिषेक ब्रह्मचारी आणि रोहित कुमार सिंह यांचे आज व्याख्यान 

 

जयसिंगपूर/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठात शनिवार १८ मार्च रोजी सकाळी ११.३० वा.स्वामी अभिषेक ब्रह्मचारी आणि युवा चेतना संघटनेचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह यांचे ‘भारतीय स्वातंत्र्याचा लढा आणि युवक’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले म्हणाले, “स्वामीजी आणि रोहितजींचे अतिथी व्याख्यान घोडावत विद्यापीठात होणार असल्याचा आम्हाला आनंद आहे. विद्यार्थी आणि पालकांसाठी नक्कीच हा एक उत्तम अनुभव असेल.” या व्याख्यानाचा अनुभव घेण्यासाठी परिसरातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी पालकांनी उपस्थित रहावे असे मी आवाहन करतो.
स्वामी अभिषेक ब्रह्मचारी हे उत्तर प्रदेशातील वाराणसी केदार घाट स्थित आश्रमातील संत आहेत. सनातन धर्माच्या प्रचार प्रसाराबरोबरच गोरगरिबांच्या उत्कर्षासाठी कार्य करतात.त्यांना महान आध्यात्मिक मार्गदर्शक मानले जाते. तरुणांना सक्षम बनवणे आणि त्यांना राष्ट्र उभारणीसाठी जबाबदार नागरिक बनवणे हे त्यांचे ध्येय आहे. मानव सेवा हीच धर्म सेवा ते मानतात.रोहित कुमार सिंह हे युवा चेतना संघटनेचे राष्ट्रीय संयोजक आहेत. याचे ध्येय हे देशातील तरुणांना सक्षम बनवणे आणि समाज सेवेसाठी प्रेरित करणे हे आहे. शेतकरी, कामगार, गरीब, नवयुवक आणि वंचितांच्या उत्कर्षासाठी काम करतात. कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत तळागाळातील माणसांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करतात. कोविड काळात त्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली सेवा बजावली आहे.
विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत म्हणाले, स्वामीजी विद्यापीठ परिसरावर कृपा करतील. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पाहणे हे माझ्यासाठी आनंददायी असेल.तरुण हीच आपल्या राष्ट्राची खरी शक्ती आहे. आपले राष्ट्र मजबूत करणे काळाची गरज आहे. यासाठी युवकांना योग्य मार्ग दाखवणे गरजेचे आहे.यासाठी सर्व युवकांनी उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments