Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्याआम्हाला गोळ्या घालून मारून टाका सौ. सायरा हसन मुश्रीफ यांची संतप्त प्रतिक्रिया

आम्हाला गोळ्या घालून मारून टाका सौ. सायरा हसन मुश्रीफ यांची संतप्त प्रतिक्रिया

आम्हाला गोळ्या घालून मारून टाका सौ. सायरा हसन मुश्रीफ यांची संतप्त प्रतिक्रिया

कागल/कोल्हापूर/प्रतिनिधी : दीड महिन्यात दुसऱ्यांदा ईडीने आज पुन्हा आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी छापा टाकला आज हसन मुश्रीफ घरी येतील यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी ही त्यांच्या घरी झाली होती.मात्र आज ईडीने मुश्रीफ यांच्या घरावर छापा टाकल्याने कार्यकर्ते संतप्त तर झालेच शिवाय मुश्रीफ यांच्या पत्नींना हे सहन झाले नाही त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले होते.काय ते एकदाच आम्हाला मारून टाका असे संतप्त कार्यकर्ते बोलत होते.
आमदार हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सौ. सायरा मुश्रीफ यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “समाजासाठी मुश्रीफसाहेब एवढं काम करतात. मात्र, असे असले तरी ईडीकडून त्यांना त्रास दिला जात आहे. आम्हाला किती त्रास देणार आहात, आम्हाला गोळ्या मारून टाका”, अशी संतप्त प्रतिक्रिया देखील सौ. सायरा हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments