पंचमहाभूतम् लोकमहोत्सवाचा शिवजयंती दिनी भव्य मिरवणुकी सह पंचगंगा नदी महाआरतीने होणार प्रांरभ
सर्वानी सहभागी होण्याचे – परमपूज्य कादसिद्धेश्वर स्वामीजीचे आवाहन
सातारा – गोजेगाव मधील तुतारी पथकासह अनेक आकर्षणे
कोल्हापूर/प्रतिनिधी : – विविध राज्यासह परदेशातील विविध मान्यवर प्रतिनिधी सहभागी असणाऱ्या सिद्धगिरी कणेरी मठावरील पंचमहाभूत लोकोत्सवाचा शुभारंभ शिवजयंती दिन रविवारी भव्य मिवणुकीसह पंचगंगा नदी येथे सामुदायिक आरतीने होत आहे. सर्वांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवावा ,असे आवाहन परमपूज्य अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजी यांनी केले आहे .
शिवाजी पेठेतील महात्मा गांधी मैदानामधून या भव्य मिरणुकीचा शुभारंभ होणार असून ही शोभायात्रा बिनखांबी गणेश मंदिर – महाद्वार रोड पापाची तिकटी मार्गे गंगावेश पंचगंगा नदी या ठिकाणी ही मिरवणूक विसर्जित होणार आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह पालकमंत्री दीपक केसरकर ,उद्योगमंत्री उदय सामंत तसेच राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आरती होणार आहे .
विविध चौदा राज्यातील पारंपारिक लोकवाद्यासह कलाकारांचा सहभाग आणि त्यांचे सादरीकरण तसेच छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित चित्रे, त्यांचे पर्यावरण विषयक विचार यांचे प्रदर्शन हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील गोजेगाव येथील ११ जणांचे घडशी – गुरव समाजाचे सामुदायिक तुतारी वादन पथक हे मुख्य आकर्षण असणार आहे.तरी या सर्वांचा नागरिकांनी स्वतःहून सहभागा सह लाभ घ्यावा. आणि येत्या २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान कणेरी मठ परिसरात होणाऱ्या या पंचमहाभूत उत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे ,असे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी केमटीची मोफत प्रवास सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून त्याचाही लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समिती च्या वतीने करण्यात आले आहे.