Sunday, December 22, 2024
Home ताज्या लम्पी आजाराने दगावलेल्या जनावरांच्या मालकांचे कर्ज माफ करा- आमदार सतेज पाटील यांची...

लम्पी आजाराने दगावलेल्या जनावरांच्या मालकांचे कर्ज माफ करा- आमदार सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी

लम्पी आजाराने दगावलेल्या जनावरांच्या मालकांचे कर्ज माफ करा- आमदार सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी

अनाथ मुलांचे सहा महिन्यात सर्वेक्षण करा — आमदार सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी :  लम्पी आजाराने दगावलेल्या जनावरांच्या मालकांचे कर्ज माफ करावे अथवा त्यापोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात यावी. तसेच अनाथ मुलांचा सर्व्हे येत्या सहा महिन्यांत करावा, अशा मागण्या आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशना दरम्यान विधान परिषदेत केल्या.                                              लम्पी बाबत विधानपरिषदेत बोलताना सतेज पाटील म्हणाले की, सध्या लम्पी आजारामुळे जनावरे दगावत आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासकीय आकडेवारीनुसार ११ हजार जनावरे लंपी आजाराने दगावली आहेत. ह्या आकडेवारी नुसार दिवसाला सव्वा लाख लिटरचे दुधाचे नुकसान होत आहे.जनावरे दगावल्यामुळे होणारे नुकसान लक्षात घेता त्यापोटी मिळणारी नुकसान भरपाई अत्यंत तुटपुंजी आहे. सध्या देशातील दूध उत्पादन अकरा टक्के घट आहे. जनावरांचा भाकडकाळ सुद्धा वाढलेला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे. त्यामुळे लम्पी आजाराने दगावलेल्या जनावरांच्या मालकांचे कर्ज माफ करावे अथवा त्यापोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली.                                                   कोल्हापुरात गोकुळ, वारणा दूध संघ तसेच पशुसंवर्धन विभागाने लम्पीग्रस्त जनावरांचे १०० टक्के लसीकरण केले. राज्यातही लसीकरणाची ही मोहीम प्रभावीपणे राबवली गेली आणि ती देशात स्वीकारली गेली.पशुसंवर्धन विभाग आयुक्त आणि त्यांच्या विभागातील कर्मचारी यांचे यासाठी कौतुक आहे. आता या जनावरांना बूस्टर डोस द्यावा लागतो की काय ? अशी स्थिती आहे, याबाबत शासनाने आपले धोरण स्पष्ट करणे गरजेचे आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि मिळणारी भरपाई याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा असे आ.पाटील यांनी सांगितले.    तसेच बालसंगोपन कार्यक्रमाविषयी लक्ष वेधी सूचनेवर बोलताना आ.सतेज पाटील यांनी सांगितले की, अनाथ झालेल्या बालकांचे संगोपन २१ वर्षांपर्यंत करण्याविषयी कायद्यात नमूद केलेले आहे. त्याची अंमलबजावणीची व्यवस्था आपण करू शकतो का? याचा विचार करणे गरजेचे आहे. तसेच कोविडमध्ये १६ हजार मुले अनाथ झाली आहेत, अशी अधिकृत आकडेवारी आहे. त्यामुळे बालसंगोपन योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून ६ महिन्यात अनाथ मुलांचे सर्वेक्षण करावे, अशी सूचना आ.पाटील यांनी केली. या सूचनेचे विधानपरिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील स्वागत केले. उत्तरादाखल बोलताना महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आ.पाटील यांच्या मागणीनुसार अनाथ मुलांचे सर्वेक्षण करण्याची विधान परिषदेत घोषणा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments