Friday, November 22, 2024
Home ताज्या यकृतामध्ये  ट्युमर असलेल्या अडीच वर्षीय लहान मुलावर सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार

यकृतामध्ये  ट्युमर असलेल्या अडीच वर्षीय लहान मुलावर सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार

यकृतामध्ये  ट्युमर असलेल्या अडीच वर्षीय लहान मुलावर सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार

कोल्हापूर/प्रतिनिधी  : यकृतामध्ये 15 सेंटीमीटर  ट्युमर असलेल्या एका अडीच वर्षीय लहान मुलावर सह्याद्रि हॉस्पिटल येथे यशस्वी उपचार करण्यात आले. एकीकडे संपूर्ण जग कोरोना महामारीविरूध्द लढत असताना दुसरीकडे या लहान मुलाच्या यकृतामध्ये 15 सेमी ट्युमर असल्याचे निदान झाले.त्याच्या आई-वडिलांना हे ऐकल्यावर धक्का बसला होता.आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांनी उपचाराची आशा देखील सोडून दिली होती.मात्र तीन महिन्यांनंतर पुढील उपचार घेण्यासाठी सह्याद्रि हॉस्पिटल पुणे येथे आले.

याबाबत माहिती देताना सह्याद्रि हॉस्पिटल्स मधील यकृत प्रत्यारोपण तज्ञ व हेड पेडियाट्रिक हेपॅटोलॉजिस्ट डॉ.स्नेहवर्धन पांडे म्हणाले की,हे कुटुंब माझ्याकडे मार्चच्या उत्तरार्धात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आले होते.त्याच्या आई-वडिलांना आपल्या मुलाची परिस्थिती पाहून धक्का बसला होता आणि उपचाराच्या खर्चासाठी पैसे नसल्याने हतबल झाले होते.मात्र मला खात्री होती की उपचार केल्यास त्यामध्ये चांगले परिणाम दिसू शकतील.फक्त त्यांना परवडत नाही म्हणून लहान मुलावर उपचार होऊ नये हे मला पटत नव्हते.आमच्या येथील सर्व कर्करोग आणि हेपॅटोबिलियरी तज्ञांची मदत घेऊन या मुलाच्या उपचाराची पुढची दिशा आखली गेली.कोणताही वेळ न घालवता आम्ही केमोथेरपी सुरू केली.दुसरीकडे विविध सामाजिक संस्थांकडे जाऊन मदतीसाठी आम्ही धाव घेतली. परिस्थिती चांगली नव्हती,कारण बहुतेक निधी कोरोनाविरूध्दच्या लढ्यासाठी वापरला जात होता.
सह्याद्रि हॉस्पिटलमधील कर्करोगतज्ञ डॉ.तुषार पाटील म्हणाले की,हा ट्युमर उच्च जोखमीचा होता.म्हणून यामध्ये कुठलीही दिरंगाई न करणे महत्त्वाचे होते.त्याच्यावर केमोथेरपीचे उपचार सुरू करण्यात आले आणि प्रत्येक तीन आठवड्याला केमोथेरपीच्या चार सायकल्स देण्यात आल्या.या मुलाने खंबीरपणे उपचाराला सामोरे जात चांगला प्रतिसाद दिला व त्याच्यामध्ये उपचारांचे कुठलेही दुष्परिणाम (साईड इफेक्टस) दिसले नाहीत.यामुळे ट्युमरचा आकार 5 सेमी पर्यंत कमी झाला आणि अल्फा फेटोप्रोटीन या ट्युमर निर्मिती करणार्‍या घटकांचे प्रमाण 35 लाखवरून 6.6 लाखावर आले.उपचार घेणे अजून लांबवले असते तर ट्युमर यकृताबाहेर पसरण्याचा धोका बळावला असता , म्हणून अशा ट्यूमर्स वर वेळेत  उपचार करणे गरजेचे असते .
सह्याद्रि हॉस्पिटलमधील हेपॅटोबिलियरी सर्जरी व प्रत्यारोपण विभागाचे ऑपरेटिंग सर्जन आणि प्रोग्रॅम डायरेक्टर डॉ.बिपिन विभूते म्हणाले की,या कुटुंबाचे कौतुक करावे तितके कमी आहे.कठिण परिस्थितीत देखील 200 किमी प्रवास करून आपल्या मुलावरचे उपचार त्यांनी सुरू ठेवले.या मुलावर हेपॅटेक्टोमी प्रक्रिया (यकृताचा काही भाग काढून टाकणे) करण्यात आली.त्यानंतर ट्युमर असल्याचे कुठलेही लक्षण त्यामध्ये दिसले नाही.ही प्रक्रिया झाल्यानंतर त्याला 5 दिवसांत डिस्चार्ज देण्यात आला.या मुलाच्या उपचारासाठी लिव्ह टू गिव्ह ,  सामाजिक कार्यकर्ते आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी सुरू केलेल्या संस्थेने आर्थिक मदत केली.
हॉस्पिटलमधून घरी जाताना उपचारादरम्यान मदत करणार्‍या सर्व डॉक्टर्स आणि कर्मचार्‍यांचे मुलाच्या आई-वडिलांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments