व्यापारी वर्गाला भेडसावणारे विविध प्रश्नासंबंधी आमदार व शासकीय अधिकारी यांचेसोबत -व्यापारी-उद्योजकांची बैठक संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : परवाना फी व परवाना फेरफार फी बाबत तसेच परवाना विभाग व फायर विभाग वेगळा करणे, तावडे हॉटेल परिसरातील ट्रक टर्मिनल व व्हिनस कॉर्नर येथील गाडी अड्डा सुरू करणे, दसरा दिवाळी सणामध्ये महाव्दार रोड बंद करू नये, टिंबर मार्केट परिसराचा फायनल ले- आऊट करावा अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज चे अध्यक्ष संजय शेटे यांनी आमदार सतेज पाटील, आमदार ॠतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांचेकडे निवेदनाव्दारे केली. कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशन ने औद्योगिक संघटना व चेंबरच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचेसोबत बैठक बोलावली होती. यावेळी महापालिकेचे अधिकारी, MSEB अधिकारी तसेच विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. आमदार सतेज पाटील यांनी प्रत्येक प्रश्नाचे समर्पक उत्तर अधिकारी यांचेकडून करवून घेतले. विशेषतः परवाना विभाग व फायर विभाग वेगळा करणे, ट्रक टर्मिनल ताबडतोब सुरू करणे, दसरा दिवाळी मध्ये महाव्दार रोड बंद करू नये आणि टिंबर मार्केट परिसराचा फायनल ले-आऊट करण्यासंदर्भात त्यांनी विशेष लक्ष देण्याचे अधिका-यांना सांगितले. यावेळी चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संचालक अजित कोठारी उपस्थित होते. टिंबर मार्केट परिसराचा फायनल ले-आऊट करण्यासंदर्भात त्यांनी बैठकीत अधिका-यांना फोन लावून तो प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या.