केआयटी च्यावतीने ‘अभियांत्रिकी मधील संधी आणि प्रवेशप्रकिया२०२२’ विषयावरील मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन
येत्या बुधवारी केशवराव भोसले नाट्यगृहात होणाऱ्या कार्यक्रमाचा विद्यार्थी व पालकांनी लाभ घेण्याचे
आवाहन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर च्यावतीने ‘१२ वी शास्त्रनंतर अभियांत्रिकी मधील संधी आणि प्रवेशप्रकिया २०२२’ या विषयावरील मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दि. १४ सप्टेंबर २०२२ रोजी , सायंकाळी ४ वाजता केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर या ठिकाणी करण्यात आले असल्याची माहिती केआयटीचे संचालक डॉ. मोहन वणरोट्टी व कार्यकारी संचालक डॉ. विलास कार्जिन्नी यांनी दिली. यंदा जाहीर झालेला १२ वी परीक्षेचा तसेच जेईईचा निकाल तर येऊ घातलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालक यांच्या मनातील गोंधळ कमी करून त्यांच्या मनातील प्रश्न व शंकांचे निरसन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातील अनुभव असलेले डॉ. मोहन वणरोट्टी व कार्यकारी संचालक डॉ. विलास कार्जिन्नी, प्रा. अजित पाटील, डॉ. महेश शिंदे यांबरोबरच अन्य तज्ञ मार्गदर्शक माहिती देणार असून या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन केआयटीच्या वतीने करण्यात आले आहे. यावर्षीपासून केआयटीमध्ये सुरू होणाऱ्या टीसीएस कंपनी पुरस्कृत कॉम्प्युटर सायन्स व बिझनेस सिस्टिम्स या शाखेच्या माहितीचे विशेष सत्र या कार्यक्रमातअसणारआहे. १९८३ पासून उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ यांनी चालवलेल्या केआयटीने आजपर्यंत हजारो कुशल अभियंते घडवले असून ते जगाच्या कानाकोपऱ्यात कार्यरत आहेत. NAAC, NBA, स्वायत्तता असे अनेक मापदंड पार केलेले केआयटी सदैव नवनवीन आणि अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करत असते. प्रा. सौरभ जोशी प्रा. अमर टिकोळे या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम करत असून संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दिपक चौगुले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.