पर्यावरणपूरक घरगुती गौरी गणपती विर्सजनास नागरिकांचा उर्त्स्फत प्रतिसाद
इराणी खणीमध्ये ५५३४४ गणेश मुर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन
कोल्हापूर/प्रतिनिधी :- घरगुती गौरी गणपती विसर्जनास शहरातील नागरीकांनी उत्सफुर्त प्रतिसाद देऊन ५५३४४ मुर्ती इराणी खणीमध्ये पर्यावरणपूरक विसर्जित करण्यात आल्या. महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देऊन शहरातील नागरकांनी पंचगंगा नदीमध्ये गणेश मुर्ती विर्सजित न करता महापालिकेच्यावतीने ठेवण्यात आलेल्या कृत्रिम कुंडामध्ये व इराणी खणीमध्ये विसर्जित केल्या. पंचगंगा नदी तसेच शहर परिसरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये म्हणून महापालिकेच्यावतीने ठिक ठिकाणी १८० विसर्जन कुंडाची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. या व्यतिरिक्त सार्वजनिक मंडळांनी, तालमींनी व संस्थांनीही काहीली, कृत्रिम विसर्जन कुंड ठेवले होते.
घरगुती गौरी गणपती विसर्जनाकरिता महापालिकेच्यावतीने सर्व यंत्रणा सकाळी ७ वाजल्यापासून दुस-या दिवशी पहाटे ४.३० वाजेपर्यंत काम करत होती. यामध्ये पवडी विभागाचे २२५ कर्मचारी, आरोग्य विभागाचे ६५० कर्मचारी व आरोग्य निरिक्षकांच्या १६ टिम, ९० टँम्पो २०० हमालासह, १० डंपर, २४ ट्रॅक्टर ट्रॉली व ५ जे.सी.बी., ७ पाण्याचे टँकर, २ रोलर, २ बुम अशी यंत्रणा तैनात करण्यात आली होती. पवडी विभागाकडून नागरिकांनी अर्पण केलेल्या गणेशमुर्ती टॅम्पोमधून नेऊन इराणी खणीमध्ये विसर्जीत करणेचे व्यवस्था केली होती. याचबरोबर महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवानही विसर्जनस्थळी सुरक्षीततेसाठी साधनसामुग्रीसह तैनात करण्यात आले होते. तसेच विद्युत विभागाकडून विसर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्थाही करण्यात आली होती. नागरिकांनी अर्पण/फेर विर्सजन केलेले निर्माल्य गोळा करण्याचे काम करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने १६ आरोग्य निरिक्षकच्या टिम व एकटी संस्थेच्या १०० महिला सदस्य निर्माल्य संकलित केले. यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने ६५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संकलित करण्यात आलेले निर्माल्य पुईखडी, बापट कॅम्प, बावडा, दुधाळी, आयसोलेश हॉस्पीटल येथे स्वतंत्र खड्डा करुन सेंद्रीय खत तयार करण्यासाठी जमा करण्यात आले आहे. आरोग्य विभागामार्फत कुंड ठवलेल्या ठिकाणांची, पंचगंगा नदीजवळी गायकवाड पुतळा परिसर व इराणी खण परिसराची दुपारी १ वाजेपर्यंत स्वच्छता सुरु होती. नागरिकांनी अर्पण केलेले १३५ मे.टन. निर्माल्य ९ डंपर व ३ ट्रॅक्टरद्वारे पहाटे ६ वाजेपर्यत गोळा करण्यात आले.
प्रशासक डॉ.कादंबरी बलवडे यांनी नागरिकांना गणेशोत्सव जास्तीत जास्त पर्यावरणपुरक, गर्दी टाळून महापालिकेने पर्यायी व्यवस्था केलेल्या कृत्रिम कुंडात विसर्जन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार गांधी मैदान विभागीय कार्यालय अंतर्गत एकूण ११२३१ छ.शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय अंतर्गत एकूण १०३३५ राजारामपुरी विभागीय कार्यालय अंतर्गत एकूण ९४४० ताराराणी विभागीय कार्यालया अंतर्गत एकूण ७६४० गणेश मुर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडात करण्यात आले. त्याचप्रमाणे शहरातून व ग्रामीण भागातुन आलेल्या १६६९८ मुर्ती नागरीकांनी थेट इराणी खण येथे विसर्जीत करण्यात आल्या. याव्यतिरिक्त काही नागरीकांनी गणेश मुर्ती घरीच बादलीमध्ये विसर्जीत केल्या. इराणी विभागीय कार्यालय व नागरीकांडून अर्पण केलेल्या मुर्ती महापालिकेने यावर्षी प्रथमच बसविलेल्या स्वयंचलित यंत्राद्वारे खणीमध्ये विसर्जित करण्यात आल्या.
सदरचे नियोजन प्रशासक डॉ.कादंबरी बलवकडे, अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, सहा.आयुक्त संदिप घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, एन.एस.पाटील, नारायण भोसले, बाबूराव दबडे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, मुख्य अग्निशनम अधिकारी तानाजी कवाळे, विद्युत अभियंता अमित दळवी, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्राबंरे, सहा.अभियंता चेतन शिंदे यांनी केले.