Tuesday, July 1, 2025
spot_img
Homeताज्यासरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची आदर्श उस विकास योजना अंमलबजावणी कौतुकास्पद डॉ....

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची आदर्श उस विकास योजना अंमलबजावणी कौतुकास्पद डॉ. महादेव पवार यांचे गौरवोद्गार

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची आदर्श उस विकास योजना अंमलबजावणी कौतुकास्पद
डॉ. महादेव पवार यांचे गौरवोद्गार

सिद्धनेर्ली येथे शेतकरी मेळाव्यात ऊस उत्पादन वाढीचे मार्गदर्शन

सिद्धनेर्ली/प्रतिनिधी :  कारखान्याचे अध्यक्ष नाविदसो मुश्रीफ यांचे नेतृत्वाखाली सरसेनापती कारखान्याची आदर्श उस विकास योजना अंमलबजावणी अत्यंत कौतुकास्पद होत असल्याचे गौरवोद्गार इंडियन फार्मर्स फर्टीलायझर को-ऑपरेटिव्ह लि. चे वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. महादेव पवार यांनी काढले. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्यावतीने सिद्धनेर्ली, ता. कागल येथे आयोजित उस पिक चर्चा सत्रादरम्यान ते बोलत होते. प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. पवार यांनी उस पिकामध्ये रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर, नॅनो युरीयाचे महत्व, रासायनिक खतांच्या तुटवड्याची कारणे व उपाययोजना याविषयावर उपस्थित शेतकऱ्याना सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना सरपंच दत्ता पाटील म्हणाले, सरसेनापती कारखान्याच्या योजना या अतिशय नाविन्यपूर्ण असून त्यांचा उस उत्पादन वाढीमध्ये फायदा होत असल्याचे सिद्ध झाले आहे. कारखान्याच्या योजना राबविण्याच्या पद्धती अतिशय शास्त्रशुद्ध असून त्या उस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहज पसंतीस पडत असल्याचेही ते म्हणाले.
उस विकास अधिकारी उत्तम परीट म्हणाले सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्या मार्फत सर्व उस विकास योजना मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्याचा लाभ शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहेत. कारखाना यापुढेही उस पिक विषयक मेळावे, प्रात्यक्षिके, चर्चासत्रे व नवनवीन तंत्रज्ञान आवश्यकतेनुसार आयोजित करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कार्यक्रमाला कागल तालुका खरेदी विक्री संघाचे मॅनेजर आत्माराम हेगडे, इफकोचे कोल्हापूर क्षेत्र व्यवस्थापक विजय बुणगे, कृष्णात मेटील, रामदास घराळ, सुभाष मगदूम, देवेंद्र जांभळे, युवराज मगदूम, शेती विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच उस उत्पादक शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.  स्वागत व प्रास्ताविक ॲग्री ओव्हरसिअर युवराज पाटील यांनी केले. आभारप्रदर्शन शेती मदतनीस तानाजी हजारे यांनी केले. सूत्रसंचालन खद्रे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments