राजर्षी शाहू जयंतीनिमित्त सारथी उपकेंद्रामार्फत कौशल्य विकास जनजागृती मेळाव्याचे आयोजन
तरुणांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा
-जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर, दि.२५(जिमाका): राजर्षी शाहू जयंतीनिमित्त रविवार दि.२६ जून २०२२ रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात सारथी उपकेंद्रामार्फत कौशल्य विकास जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या लक्षित समाजघटकातील उमेदवारांकरिता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने हा मेळावा घेण्यात येत आहे. १८ ते ४५ वयोगटातील अधिकाधिक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा. मेळाव्यादरम्यान उपस्थित उमेदवारांना समुपदेशनासह शासकीय यंत्रणांमार्फत विविध योजनांसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे कौशल्य विकासाद्वारे उपलब्ध असणा-या विविध संधींबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रातील उद्योगांमध्ये यशस्वी उद्योजक मनोगत व्यक्त करणार आहेत. या मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील Google form भरावा. https://forms.gle/9jv8eHhmhyf2a24D7