आजरेकर फौंडेशनचे अध्यक्ष अश्पाक आजरेकर यांनी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देवून सामाजिक स्तुत्य उपक्रम राबविला
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील आजरेकर फौंडेशनचे श्री. अश्पाक आजरेकर यांचा वाढदिवस आज शासन नियमावलीनुसार सोशल डिस्टंसिंगचे पालन करून तसेच अनावश्यक खर्चाला फाटा देत शेलाजी वन्नाजी विद्यालयाच्या प्रांगणात अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
जिल्हयाचे पालकमंत्री मा. सतेज उर्फ बंटी पाटील व मा. आमदार ऋतुराज पाटील यांच्या निर्देशानुसार “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” या उपक्रमाच्या धर्तीवर अश्पाक आजरेकर यांनी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत “माझा प्रभाग – माझे कुटुंब” हा उपक्रम राबवून कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. 26 कॉमर्स कॉलेज या प्रभागातील नागरीकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक कुटुंबाला वाफेचे मशिन वाटप करून साजरा केला.
या कार्यक्रमावेळी कोल्हापूर महापालिकेच्या महापौर सौ. निलोफर आजरेकर, उपमहापौर मा. संजय मोहिते, स्थायी समिती सभापती मा. सचिन पाटील, सभागृह नेते मा. दिलीप पोवार, राष्ट्रीय काँग्रेस गटनेते मा. शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक हरीदास सोनवणे, बांधकाम व्यवसायिक जयेश कदम, सौ.मंगला हजारे, यांनी शुभेच्छा देवून आपले मनोगत व्यक्त केले.
या उपक्रमावेळी नगरसेवक अर्जुन माने, प्रतापसिंह जाधव, उदयोगपती तेज घाटगे, पूजा भोर, मुस्लिम बोर्डींगचे चेअरमन गणी आजरेकर, आश्कीन आजरेकर, बिल्कीस सय्यद, अलका सोमोशी, विनोद पंडत, बाळासाहेब पंडत, अभिजित सुर्यवंशी, निशिकांत वाकडे, महादेव पोवार, निषाद शेख, कांबळे मॅडम, सुधीर खराडे, फारूख ईगळीकर, राजू जमादार, बाळासाहेब पवार यांचेसह भागातील नागरीक उपस्थित होते.