उद्या अल्ट्रा रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
कोल्हापुर/प्रतिनिधी : रगेडियन स्पोर्ट्स क्लब व कोल्हापूर स्पोर्ट्स बा क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने अल्ट्रा रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ , राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रवकर आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे सकाळी ५ वाजता पोलीस ग्राउंड येथे उद्घाटन होईल. या स्पर्धेला महाराष्ट्रातील नामवंत खेळाडूंसह महाराष्ट्राच्या बाहेरील खेळाडू देखील सहभागी होणार आहेत.सध्या सुरू असलेल्या छ.शाहूंच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वाच्या पार्श्भूमीवर या मॅरेथॉनला विशेष महत्त्व आहे. शाहूं महाराजांचे मल्लविद्या ,मल्लखांब या मर्दानी खेळाबद्दल असणारे प्रेम तसेच सुदृढ आरोग्यासाठी खेळाचे महत्व , महाराष्टातील खेळाडूंसह बाहेरील राज्यातून येणाऱ्या खेळाडूंना या निमित्ताने अनुभवता येईल .शारीरिक तंदुरुस्तीला महत्त्व देणाऱ्या शाहूंच्या विचारांचा संदेश या निमित्ताने संपूर्ण भारतात पोहोचेल. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना मेडल देवून आणि विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी देवून गौरविण्यात येणार आहे.
पोलिस ग्राउंड येथून सुरू आलेली मॅरेथॉन उजळाई वाडी येथे समाप्त होईल , दरम्यान पुढारी ,टोमॅटो एफ एम , एस जे आर टायर्स ,आणि वायू डाईन टेक अप यांचे सहकार्य या स्पर्धेला लाभले आहे .