Thursday, October 23, 2025
spot_img
Homeदेशमी बरा आहे तुम्ही सुखरूप रहा, मंत्री मुश्रीफानी साधला रुग्णांशी संवाद, महाराष्ट्रातील...

मी बरा आहे तुम्ही सुखरूप रहा, मंत्री मुश्रीफानी साधला रुग्णांशी संवाद, महाराष्ट्रातील पहिल्या वैद्यकीय हेल्पलाइन सेंटरचे उद्घाटन

मी बरा आहे तुम्ही सुखरूप रहा,
मंत्री मुश्रीफानी साधला रुग्णांशी संवाद, महाराष्ट्रातील पहिल्या वैद्यकीय हेल्पलाइन सेंटरचे उद्घाटन

 

कोल्हापूर/कागल/प्रतिनिधी : कोरोनातून मी पूर्णता बरा झालो आहे. तुम्हीही सुखरूप रहा, असा काळजीपूर्वक सल्ला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी विविध आजारांच्या रुग्णांना फोनवरून दिला. कोरोणाच्या या माहामारीत कोरोणासह इतर आजारांपासून बचावासाठी घरीच रहा, गर्दी टाळा, मास्क वापरा व स्वच्छता पाळा असा संदेशही त्यांनी दिला.
कागल पंचायत समितीमध्ये सुरू केलेल्या वैद्यकीय हेल्पलाइन केंद्रावरून श्री. मुश्रीफ यांनी  स्वतः फोन करीत रुग्णांशी संवाद साधला व उद्घाटन केले. या केंद्रामधून उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलता, कर्करोग इत्यादी विविध आजारांच्या रुग्णांना दररोज सरासरी २०० कॉल केले जाणार आहेत.
यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम अभिनव व अत्यंत लोकोपयोगी आहे. अशा प्रकारचा महाराष्ट्र राज्यातील हा पहिला व एकमेव उपक्रम आहे. कोरोनाने झालेल्या एकूण मृत्यु पैकी ६० ते ६५ टक्के मृत्यू हे इतर व्याधीग्रस्तांचे आहेत. त्यामुळे इतर व्याधिग्रस्तांनी खबरदारीने राहणे महत्त्वाचे आहे. तज्ञांच्या अभ्यासानुसार अद्यापही ७० टक्केच लोक मास्क वापरत आहेत. १०० टक्के लोकांनी मास्क वापरल्यास कोरोनाचा कहर अजूनही कमी होईल.
प्रास्ताविकपर भाषणात गटविकास अधिकारी सुशील संसारे म्हणाले, या कॉल सेंटरमधून दररोज २०० व्यक्तींना कॉल केले जाणार आहेत. त्यांच्या तब्येतीची चौकशी करून त्यांना काही त्रास जाणवत असल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून व गरज पडल्यास कोवीड केअर सेंटरमधून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. तसेच मास्कचा वापर व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, वैयक्तिक – सार्वजनिक स्वच्छता व सामाजिक अंतर याबाबत समुपदेशन केले जाणार आहे.
श्री मुश्रीफ यांनी शिवाजीराव माने – कसबा सांगाव, श्रीकांत मगदूम- सिद्धनेर्ली, आण्णासो तोडकर – लिंगनूर दुमाला, सुमन पोवार- बिद्री, विलास दारवाडकर- यमगे या रुग्णांशी संवाद साधला.
यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, सभापती सौ. पुनम राहुल मगदूम- महाडिक, उपसभापती दिपक सोनार, माजी उपसभापती विजय भोसले, माजी उपसभापती रमेश तोडकर, सदस्य जयदीप पोवार, सौ. रुपाली सुतार, राजेंद्र माने, शशिकांत खोत, तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे आदी प्रमुख उपस्थित होते.

चौकट
लवकर निदान -लवकर उपचार मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, माझे कुटुंब- माझी जबाबदारी या अभियानाच्या सर्वेक्षणातून कागल तालुक्यात १५,३७९ रुग्ण हे उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग इत्यादी व्याधीने ग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. दररोज २०० जणांशी संवाद याप्रमाणे या सर्वांशी वैयक्तिक संवाद साधला जाणार आहे. त्यांच्या आरोग्यविषयक अडचणी जाणून घेऊन त्यांना तातडीने वैद्यकीय सेवाही पुरविली जाणार आहे. लवकर निदान लवकर- उपचार या तत्त्वावर या कॉल सेंटरची कार्यप्रणाली चालणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments