२७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुक: १७ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध
कोल्हापूर (जिमाका) : २७६-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक २०२२ साठी १७ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे आज झालेल्या छाननीत वैध ठरली तर २ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी दिली.
२७६-कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी वैध ठरलेली नामनिर्देशनपत्रे पुढील प्रमाणे-
जाधव जयश्री चंद्रकांत(आण्णा) (इंडियन नॅशनल काँग्रेस), सत्यजीत (नाना) कदम (भारतीय जनता पार्टी), यशवंत कृष्णा शेळके [नॅशनल सोशालिस्ट पार्टी (युनायटेड)], विजय शामराव केसरकर (लोकराज्य जनता पार्टी), शाहीद शहाजान शेख (वंचित बहुजन आघाडी), आसलम बादशहाजी सय्यद (अपक्ष), देसाई सुभाष वैजू (अपक्ष), बाजीराव सदाशिव नाईक (अपक्ष), भोसले भारत संभाजी (अपक्ष), मनिषा मनोहर कारंडे (अपक्ष), माने अरविंद भिवा (अपक्ष), मुस्ताक अजीज मुल्ला (अपक्ष), मुंडे करुणा धनंजय (अपक्ष), राजेश उर्फ बळवंत सत्याप्पा नाईक (अपक्ष), राजेश सदाशिव कांबळे (अपक्ष), संजय भिकाजी मागाडे (अपक्ष) व संतोष गणपती बिसुरे (अपक्ष).