प्रसिद्ध गायक जावेद अली यांच्या हस्ते टाकाळा रोड इथं फ्लेमस् रेस्टॉरंटचा शुभारंभ

0
157

कोल्हापुरातील खवय्यांना देश-विदेशातील पदार्थांचा आस्वाद देण्यासाठी, टाकाळा रोडवर  फ्लेम्स हे नवे रेस्टॉरंट सुरू झाले आहे. यापूर्वी अनेक पंचतारांकीत हॉटेल आणि आंतरराष्ट्रीय क्रुझवर शेफ म्हणून काम करणार्‍या रथीन यांनी, या रेस्टॉरंटद्वारे कोल्हापूरच्या खवय्यांना नवनवीन डिशेस उपलब्ध केल्या आहेत. प्रसिद्ध गायक जावेद अली यांच्या हस्ते नुकतेच या रेस्टॉरंटचे शानदार उद्घाटन झाले. इटालियन, थाई, मेक्सिकन, चायनीज अशा जगभरातील प्रसिद्ध खाद्यशैलीमधील डिशेस या रेस्टॉरंटमध्ये चाखायला मिळणार आहेत. सीझलर्स, पिझ्झा, बर्गर, सॅण्डविचेस यासह अनेक कॉन्टिनेंटल डिशेस येथे उपलब्ध असणार आहेत.
कोल्हापुरातील खवय्यांना देश-विदेशातील चविष्ट खाद्यपदार्थांच्या डिशेस मिळाव्यात, यासाठी कोल्हापुरातील दोन मित्रांनी एकत्र येऊन, फ्लेमस रेस्टॉरंट सुरू केले आहे. टाकाळा मेन रोड इथल्या भाग्यश्री अपार्टमेंटमध्ये सुरू केलेल्या रेस्टॉरंटचे उद्घाटन, बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक, पुष्पा फेम जावेद अली यांच्या हस्ते करण्यात आले. मुळचे कोल्हापूरचे शेफ असलेल्या रथीन यांनी यापूर्वी देश-विदेशातील प्रसिद्ध पंचतारांकीत हॉटेलमध्ये काम केले आहे. त्यांच्या हातचे पदार्थ गायक जावेद अली यांनी चाखले आहेत. त्यामुळे त्यांच्या नव्या रेस्टॉरंटचं उद्घाटन करण्यासाठी कोल्हापुरात येण्याचा शब्द, जावेद अली यांनी रथीन यांना दिला होता. त्यानुसार जावेद अली यांनी फ्लेमस् बाय शेफ रथीन या नव्या रेस्टॉरंटचे उद्घाटन करून, दिलेला शब्द पाळला. तसंच कोल्हापूरकरांच्या आग्रहास्तव त्यांनी श्रीवल्ली गाण्याच्या ओळीही गायिल्या. फ्लेमस् रेस्टॉरंटमध्ये इटालियन, थाई, मेक्सिकन, ओरिएन्टल, चायनीज अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण आणि चविष्ट डिशेस उपलब्ध आहेत. तसंच स्टोक्स, सलाडस्, थाई करी पेपर राईस, बर्मिज खाऊसे, करीज आणि सीझलर्स मिळणार आहेत. विशेष म्हणजे इथं  शेफनी तयार केलेला फ्रेश पिझ्झा बेस वापरून, अस्सल इटालियन थिन क्रश पिझ्झाही मिळेल. सोबत पास्ता, बर्गर्स, सँडविच, मॉकटेल, कॉफी यांचेही काऊंटर्स रेस्टॉरंटमध्ये आहेत. कोल्हापूरकरांनी फ्लेम्स रेस्टारंटला भेट देऊन देश-विदेशातील प्रसिद्ध डिशेसचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन शेफ रथीन आणि राहुल जोशी यांनी केले आहे.