मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन
मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा वयाच्या ९३ व्या वर्षी मृत्यू झाला आहे. याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली. ३० जानेवारी १९२९ ही त्यांची जन्मतारीख होती.मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश देव यांच्या मागे पत्नी सीमा देव,अजिंक्य देव, अभिनय देव तसेच नातवंडे आर्य देव, तान्या देव असा परिवार आहे.रमेश देव चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेता होते. त्यांनी त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत २८५ हून अधिक हिंदी चित्रपट, १९० मराठी चित्रपट आणि ३० मराठी नाटकांमध्ये काम केले होते.त्यांनी फीचर फिल्म्स, टेलिव्हिजन मालिका आणि २५० हून अधिक जाहिरात चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे.निर्मात व दिग्दर्शक म्हणूनही त्यांची ओळख होती.