केंद्रीय आरोग्य-कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडून माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या संसदीय कामागिरीची मुक्त कंठाने प्रशंसा
कोल्हापूर/प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आज कसबा बावडा येथील भाजपच्या मंडलद्वारे करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य-कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या सोबत उपस्थिती लावली. यावेळी धनंजय महाडिक यांच्या संसदीय कामागिरीची पवार यांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली. आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत आपण त्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन घेऊ, असेही नामदार पवार यांनी नमूद केले. गेली ७ वर्षापासून पंतप्रधान मोदी हे देशवासियांसाठी अखंडपणे, मोठया उर्जेने काम करत असल्याचे प्रतिपादन मंत्री डॉ. पवार यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. त्यांचा हा ८४ वा रेडिओ कार्यक्रम आहे. सुरवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या दोन वर्षांत केलेल्या कोरोनाविरुद्धच्या उपाययोजनाबाबतची माहिती मोदी यांनी दिली. त्यांचा हा कार्यक्रम लाईव्ह पाहण्याची सुविधा कसबा बावडा, भाजप मंडलच्यावतीने केली होती. या कार्यक्रमाला मंत्री डॉ. भारती पवार यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासमवेत हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तडफदार कामगिरीमुळे देश लस निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण बनलाय. तसेच लसीकरणातही आघाडी घेतलीय. ही खरी देशाची आत्मनिर्भरता असल्याचे गौरवोद्गार डॉ. भारती पवार यांनी काढले. यावेळी त्यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या संसदीय कामगिरीची मुक्त कंठाने प्रशंसा केली. संसदीय कामकाजाचा धनंजय महाडिक यांना चांगला अनुभव आहे. जिल्हास्तरापासून देशपातळीवरील हजारो प्रश्न महाडिक यांनी संसदेत उपस्थित केले. ज्या त्या मंत्र्यांची वैयक्तिक स्तरावर भेट घेऊन महाडिक यांनी प्रश्न सोडवण्याविषयीची तळमळ आपल्या प्रयत्नातून दाखवून दिली. यातूनच त्यांना तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला. सर्वच मंत्री आणि संसद सदस्यांशी त्यांनी स्नेहाचे आणि मैत्रीपूर्ण संबंध जपले. एकूणच कोणताही प्रश्न केंद्र सरकारच्या माध्यमातून मार्गी लावण्याची हातोटी त्यांच्याकडे असल्यामुळे आपणही याबाबतीत त्यांचे सहकार्य घेत असल्याचे मंत्री भारती पवार यांनी नमूद केले. जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी महाडिक यांना सहकार्य करण्याची ग्वाही पवार यांनी दिली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, डॉ. सदानंद राजवर्धन, संजय जासूद, धीरज पाटील, मनोज इंगळे, तानाजी रणदिवे, प्रदीप उलपे, राजाराम परीट, रवींद्र पवार, विजय जाधव, दिलीप मैत्राणी यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. कायाकल्प पुरस्कार मिळवलेल्या सेवा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्यांचा सत्कार नामदार पवार आणि धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. तत्पूर्वी नामदार पवार यांनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतले. देवस्थान समितीच्यावतीनं सचिव शिवराज नायकवडे, व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी त्यांचा सत्कार केला.
.