इचलकरंजी येथील पालिकेत २० हजार रूपयांची लाच स्विकारताना शाखा अभियंता व पेंटर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
कोल्हापूर/प्रतिनिधी : इचलकरंजी येथील नगर रचना खात्यातील शाखा अभियंता बबन कूष्णा खोत व खासगी इसम किरण कूमार विलास कोकाटे यानां आज पालिकेच्या आवारात २० हजार रूपयांची लाच स्विकारतानां लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापङला. ही कारवाई दूपारी एक वाजण्याच्या सूमारास सापळा रचून करण्यात आली.याबाबत आधिक माहीती अशी तक्रारदार यांच्या जमिनिची गूंठेवारी पोट विभागणीची फाईल इचलकरंजी नगरपरिषद येथे प्रलंबित होती. त्या फाईलवर मूख्याधिकारी इचलकरंजी नगरपरिषद यांची सही घेवून काम पूर्ण करून देण्यासाठी प्रथम २५ हजार रूपयांची लाचेची मागणी केली होती. तङजोङीअंती ही रक्कम २० हजार रूपये देण्याचे ठरले. ही रक्कम खासगी इसमाकङून स्विकारतानां शाखा अभियंता बबन कूष्णा खोत”नगर रचना विभाग इचलकरंजी” व खासगी इसम किरणकूमार विलास कोकाटे वय ४६ रा .8./ १३०५ ” संतमळा इचलकरंजी याला आज लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकङले. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक आदिनाथ बूधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काॅ. शरद पोरे”पो.ना. विकास माने”पो.ना. सूनिल घोसाळकर”पो.काॅ. रूपेश माने यांनी सापळा रचून ही कारवाई केली.