Thursday, December 26, 2024
Home ताज्या सोशल इनोव्हेशनवर ९ वी राष्ट्रीय परिषद १७ नोव्हेंबरपासून

सोशल इनोव्हेशनवर ९ वी राष्ट्रीय परिषद १७ नोव्हेंबरपासून

सोशल इनोव्हेशनवर ९ वी राष्ट्रीय परिषद १७ नोव्हेंबरपासून

कोल्हापूर/प्रतिनिधी : पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) तर्फे 9 व्या नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन (एनसीएसआय) चे आयोजन १७ व १८ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात येणार आहे.ही वार्षिक राष्ट्रीय परिषद पीआयसीचा मुख्य उपक्रम असून कोविड-१९ महामारीमुळे यंंदा व्हर्च्युअल पध्दतीने आयोजित करण्यात येणार आहे.
देशभरातून १४० अर्जांमधून अंतिम फेरीसाठी आदिवासी,ग्रामीण आणि शहरी श्रेणींमध्ये सामाजिक नवसंकल्पनांसाठी १८ स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे.टाटा केमिकल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक मुकुंद रामकृष्णन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील,तर माणदेशी बँक व फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष चेतना गाला सिन्हा या समारोप प्रसंगी बीजभाषण करतील.
एनसीएसआय २०२१ चे आयोजन पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी)सह नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन, अहमदाबाद  आणि टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस,मुंबई) यांच्या सहयोगाने करण्यात आले असून याद्वारे नवसंकल्पनाकारांना त्यांच्या संकल्पनांतून नवविचार सादर करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल.ही दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद सर्वांसाठी खुली असून व्हर्च्युअल पध्दतीने यात सहभागी होण्यासाठी झूम लिंकवर संपर्क करावा.यंदाच्या राष्ट्रीय परिषदेत छत्तीसगड,झारखंड,मेघालय आणि नागालँड सह भारतभरातील २४ राज्यांमधून प्रवेशिका आल्या आहेत. यावर्षीच्या १८ अंतिम स्पर्धकांनी सादर केलेल्या संकल्पनांमध्ये पर्यावरणशास्त्र,शिक्षण,आपत्ती व्यवस्थापन,आरोग्य,कृषी,दिव्यांग व्यक्तींचे सशक्तीकरण,बांधकाम आणि अक्षय उर्जा इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम   कोल्हापूर/प्रतिनिधी : मोटोहॉस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि....

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या...

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

Recent Comments