कोल्हापूर : महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेशासाठी अग्रगण्य असणारी संस्था विश्व मेडिकल अडमिशन पॉईंट, दरवर्षी प्रमाणे यावर्षी महाराष्ट्रातून सुमारे २०० विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या शिक्षणासाठी आज जॉर्जियाला रवाना करण्यात आले आहे. यावेळी विश्वचे संस्थापक श्री. ज्ञानेश्वर भस्मे, संचालक श्री. प्रमोद कमलाकर, श्री. प्रथमेश भस्मे, श्री. प्रशांत कमलाकर, श्री. प्रसाद कमलाकर, श्री आदित्य खटावकर, सौ. प्रियदर्शनी खटावकर यांच्यासह विश्वची संपूर्ण टिम मुंबई एअरपोर्टवर या विद्यार्थ्यांना पुढील मार्गदर्शनासाठी उपस्थित होती.
गेल्या २२ वर्षापासून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मेडिकलच्या प्रवेशासाठी लागणारे परिपुर्ण मार्गदर्शन विश्व मेडिकल अॅडमिशन पॉईंटच्या वतीने दरवर्षी मोफत करण्यात येते. गेल्यावर्षी सुमारे ३००० हून अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेवून आपला प्रवेश निश्चीत केला. यावर्षीही नीट परिक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या मेडिकल प्रवेशासाठी विश्वने मोफत मार्गदर्शन केले आणि आज सुमारे २०० विद्यार्थ्यांची पहिली बॅच एमबीबीएसच्या शिक्षणासाठी जॉर्जिया या देशात पाठविण्यात आली. दुसरी बॅच लवकरच पाठविण्याचा मानस असल्याचे विश्वचे संस्थापक ज्ञानेश्वर भस्मे यांनी यावेळी स्पष्ट केला.
भारतात आणि परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी ही संस्था मार्गदर्शन करते. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना विश्व संस्थेमार्फत मोफत मार्गदर्शन दिले जाते. ५००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात पाठवले आहे. कमी बजेट मध्ये सुरक्षित आणि दर्जेदार शिक्षण, परदेशातही मराठी मुलांसाठी संस्थेचे हॉस्टेल, महाराष्ट्रीयन आचारी तसेच शिक्षक या सुविधा विश्व तर्फे परदेशातही पुरविल्या जातात. या विद्यार्थ्यांसाठी विश्वचे ६ संचालक, २०० कर्मचारी अगदी ३६५ दिवस कार्यरत असतात. विश्व मेडिकल अॅडमिशन पॉईंटच्या महाराष्ट्रात १६ कार्यालय आहेत. भारतातील तसेच परदेशातील विद्यापीठांमध्ये संस्थेची पार्टनरशिप आहे. विद्यार्थ्यांसाठी विश्व मार्फत एज्युकेशन लोन व्यवस्था, पासपोर्ट सेवा, विमान तिकीट आणि करंसी एक्चेंज या सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात.
नीट परिक्षेच्या निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण पुर्ण करुन डॉक्टर होण्याची इच्छा असते. पण नीट परिक्षेत नॉन इलिजीबल झाल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. अशा विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश कशाप्रकारे मिळतो आणि त्याबाबतच्या शैक्षणिक पध्दतीची माहिती देण्यासाठी विश्व मेडिकल अॅडमिशन पॉईंट ने यावर्षी नवा उपक्रम आणला आहे. त्याबाबतचे मोफत मार्गदर्शन कोल्हापूर, पुणे, मुंबई, बेंगलोर, नाशिक याठिकाणी सुरु केले आहे. सकाळी ११ ते सायं. ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसह पालकांना मेडिकलच्या कोर्स बाबतची माहिती देण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम ७०३०३०६६११ या क्रमांकावर संपर्क साधून आपली वेळ निश्चित करावी आणि विश्वच्या कार्यालयास भेट द्यावी असे आवाहन संचालक ज्ञानेश्वर भस्मे, प्रथमेश भस्मे आणि प्रमोदसर यांनी केले आहे.







