Friday, October 24, 2025
spot_img
Homeग्लोबलमहापालिका शाळेत प्रवेश मिळाला म्हणून पालकांचा पेढे वाटून आनंदोत्सव

महापालिका शाळेत प्रवेश मिळाला म्हणून पालकांचा पेढे वाटून आनंदोत्सव

कोल्हापूर ता 25 : सध्या नव्या शैक्षणिक वर्षाची धामधूम सुरू आहे. मुलांच्या प्रवेशासाठी पालकांची धावपळ सुरू आहे. मुलाला मोठया शाळेत प्रवेश मिळावा म्हणून आई-बाबा धडपडत आहेत. या दरम्यान महापालिकेच्या शाळेतील गुणवत्ता, शैक्षणिक दर्जावर विश्वास दर्शविणारी आणि नावलौकिक वाढविणारी सुखद घटना घडली आहे. इयत्ता दुसरीच्या सेमी इंग्रजी वर्गात मुलाचा प्रवेश निश्चित झाल्याचे समजताच पालकांनी पेढयाचा बॉक्स घेऊन शाळा गाठली आणि उपस्थितांना पेढे वाटप करत आनंद साजरा केला. विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास संपादन करणारी ही किमया साधली आहे, जरगनगर येथील श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग या विद्यामंदिराने.महापालिकेच्या सर्वच शाळांमधून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत.  सुसज्ज इमारती, ई-लर्निंग, सेमी इंग्रजी वर्ग, बोलक्‍या भिंती, ज्ञान रचनावाद इत्यादी महापालिकेच्या अनुभवी शिक्षक वर्गाने स्वत:चे असे शैक्षणिक व्हिडीओज बनविलेले आहेत. अभ्यासक्रमाचे नियोजन करुन त्यानुसार व्हिडीओ प्रसारणाचे कार्य सुरु आहे. शिवाय गुगल मीट, झूम, वेबेक्स इत्यादींच्या माध्यमातून प्रभावी अध्यापनास सुरुवात केलेली आहे. तसेच शिक्षक पालकांशी वेळोवेळी संपर्क साधत आहेत. त्यामुळे पालक वर्ग महापालिका शाळांकडे आकर्षित होत आहे. जरगनगर विद्यामंदिर म्हटले की गुणवत्तेचा मानदंड असे जणू समीकरण बनले आहे. शालेय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व अन्य स्पर्धा परीक्षेत येथील विद्यार्थ्यांनी यशाचा झेंडा फडकविला आहे. यावर्षी या शाळेची पटसंख्या 2210 पर्यंत पोहचली आहे. जरगनगर विद्यामंदिर येथे पहिली ते सातवीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. दरवर्षी या शाळेत गुढीपाडव्यादिवशी प्रवेश फुल्ल होतात. दरवर्षी गुढीपाडव्यादिवशी प्रवेशासाठी सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत उभे असतात. यावरुन शाळेला मिळालेली पसंती स्पष्ट होते. यंदाही ही परंपरा कायम राहिली आहे. शाळेने गुणवत्ता टिकवण्यासाठी घेतलेले कष्ट, सरकारी शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत विद्यार्थ्यांच्या संख्येची चढती कमान या गोष्टींची शाबासकीची जणू मुलांच्या वाढत्या प्रवेशाने मिळाली आहे. शिक्षकांना व शाळेला सुद्धा विविध आदर्श पुरस्कारांनी सन्मानित केले. दरम्यान या आठवड्यात एका पालकाने आपल्या पाल्याला सेमी इंग्रजी वर्गात प्रवेश मिळाला म्हणून शाळेत पेढे वाटप केले. ही घटना शिक्षकांना प्रोत्साहित करणारी आहे.  महापालिकेच्या सर्वच शाळांना उदंड पालकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments