तब्बल पाच महिन्यानंतर लालपरी पुन्हा धावली
कोल्हापूर/ प्रतिनिधी : सर्वसामान्यांना सुखकर वाटणारा प्रवास म्हणजे रेल्वे आणि एसटी ही एसटी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच सहा महिन्यापासून बंद होती ती आता पुन्हा आजपासून आपल्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे आज कोल्हापूर येथील एसटी स्टँड वर कोल्हापूर – सांगली, कोल्हापूर – इस्लामपूर, कोल्हापूर – कोडोली, कोल्हापुर – इचलकरंजी, कोल्हापूर – मुंबई कोल्हापूर – पुणे – गारगोटी मार्गावर धावणारी लालपरी प्रवाशांना सेवा देण्यासाठी आपल्या आपल्या फलाट क्रमांक वर दाखल झाली होती काही तुरळक प्रवासी आज एसटी स्टँड वर जाण्यासाठी आले होते मात्र ५० टक्के क्षमतेने ही सेवा देण्याचे आदेश राज्य सरकारने व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने दिले होते. त्यामुळे प्रवासी कमी असल्याने जवळ जवळ दीड ते दोन तास कालावधीनंतर या बसेस आज एसटी स्टॅन्ड परिसरातून धावल्या नेहमी गजबजलेला हा परिसर गेल्या पाच महिन्यापासून गर्दीच्या वरदळीतून बाहेर पडला होता आणि या ठिकाणी नीरव शांतता होती आज काहीसा या ठिकाणी प्रवाशांचा वावर दिसून आला कारण ही लालपरी पुन्हा एकदा आपली सेवा देण्यासाठी एसटी स्टँड वर दाखल झाली आहे आणि आज पासून तिच्यातून प्रवाशांना सेवा देण्यास सुरुवात झाली.