Thursday, January 2, 2025
Home ताज्या यापुढे मादी वासरेच जन्माला येणार – माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण...

यापुढे मादी वासरेच जन्माला येणार – माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे

यापुढे मादी वासरेच जन्माला येणार
– माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे

कोल्हापूर/प्रतिनिधी : कृत्रिम रेतनाद्वारे जास्तीत जास्त मादी वासरेच जन्मास येऊन दुध उत्पादन वाढावे व दुध उत्पादकास आर्थिक फायदा व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत ९० टक्के मादी वासरेच जन्मास येतील अशा लिंगविनिश्चित वीर्यामात्रा १८१ रुपये इतक्या नाममात्र किमतीत उपलब्ध करणेत येणार आहेत. गोकुळ मार्फत मादी वासरेच जन्मास येतील अशा लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यामात्रा उपलब्ध करणेत आल्या होत्या पण किमत जास्त असलेने दुध उत्पादकाकडून त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अशा लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यामात्रा नाममात्र किंमतीत शासनाकून उपलब्ध व्हाव्यात यासाठी गोकुळचे जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी दुग्ध विकास मंत्री सुनील केदार तसेच पशुसंवर्धन आयुक्त यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता त्यास यश आले. या निर्णयामुळे दुध उत्पादकांच्या गोठ्यात जातीवंत दुधाळ जनावरांची पैदास वाढणार असून दुध उत्पादनातही वाढ होणार आहे. निसर्ग नियमानुसार जनावरामध्ये ५० टक्के नर व ५० टक्के मादी वासरे जन्मास येतात सध्या अशा लिंगविनिश्चित केलेल्या विर्यमात्रांची बाजारातील सरासरी किंमत १००० ते १३०० रुपये इतकी आहे.
महाराष्ट्र राज्यात ४ मार्च २०१५ पासून संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू करणेत आलेला आहे. तसेच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण यामध्ये वाढ झालेने शेतीकामासाठी बैलांची आवश्यकता कमी झालेली आहे. त्यामुळे कृत्रिम रेतनाद्वारे जन्मास येणाऱ्या नर वासरांचे संगोपन करणेसाठी दुध उत्पादकांना अनावश्यक खर्च सोसावा लागत होता. तसेच नर वासरांचे  संगोपन करावे लागल्याने दुधाळ जनावरांना चार कमी पडतो परिणामी अनुवांशिक क्षमता असुनहि त्यांच्या दुध उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. यापुढे पारंपारिक विर्यामात्रा ऐवजी लिंगविनिश्चित वीर्यामात्रा  निर्मिती या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादित केलेल्या विर्यामात्रांचा गाई-म्हशीमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमांतर्गत वापर केलेस त्यापासून ९० टक्के मादी वासरांची निर्मिती करणे शक्य होणार आहे.
महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत  सदरच्या लिंगविनिश्चित केलेल्या  वीर्यामात्रा उत्पादन व पुरवठा करण्याचे काम Genus Genus Breeding India Pvt. Ltd. (ABS India)  या संस्थेला देण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून  शासन निर्णयानुसार केंद्र सहाय्यित (६०:४०) राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत हा कार्यक्रम सन २०२१-२२ पासून पुढील ५ वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. वरील  लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यामात्रा राज्यातील सहकारी / खाजगी दुध  संघांना त्यांच्या दुध उत्पादकाकडील जनावरांना कृत्रिम रेतन करणेसाठी मागणीप्रमाणे १८१ रुपये प्रति वीर्यमात्रा या दराने उपलब्ध करण्यात येणार आहेत. यापैकी दुध संघ आपले १०० रुपये घालणार असून सदरची लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यामात्रा दुध उत्पादकांना प्रति विर्यामात्रा ८१ रुपये या दराने  उपलब्ध होणार आहेत. या लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यामात्रा गोकुळ दुध संघामार्फत लवकरच उपलब्ध होतील असे अरुण डोंगळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोरगावकर ग्रुपचे  आचला फार्म हाऊस  पर्यटकांच्या सेवेत दाखल

कोरगावकर ग्रुपचे  आचला फार्म हाऊस  पर्यटकांच्या सेवेत दाखल कोल्हापूर/प्रतिनिधी : मसाई पठार जवळ कोरगावकर ग्रुप कडून उभा करण्यात आलेल्या *आचला फार्म हाऊस* पर्यटकांचा सेवेत दाखल...

सतेज कृषी प्रदर्शनास सुरुवात,३० डिसेंबर पर्यंत चालणार प्रदर्शन

तपोवन मैदानावर दि. २७ ते ३० डिसेंबर २०२४ चार दिवस सतेज कृषी प्रदर्शन सतेज कृषी प्रदर्शनास सुरुवात,३० डिसेंबर पर्यंत चालणार प्रदर्शन कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली...

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम   कोल्हापूर/प्रतिनिधी : मोटोहॉस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि....

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या...

Recent Comments