Thursday, November 21, 2024
Home देश केडीसीसी बँकेकडे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर १५  कोटींच्या ठेवी जमा

केडीसीसी बँकेकडे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर १५  कोटींच्या ठेवी जमा

केडीसीसी बँकेकडे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर १५  कोटींच्या ठेवी जमा

७,१४३ कोटी ठेवीसह, १४७ कोटी ढोबळ नफा व ११ हजार कोटी व्यवसायाचा टप्पा बँकेने यशस्वीरित्या केला पार

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे मंगळवारी ता. १३ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तब्बल १५ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. सणादिवशीही ठेव संकलनासाठी बँकेच्या सर्व म्हणजेच १९१ शाखा सुरूच ठेवल्या होत्या. चांगल्या व्याजदरामुळे बँकेच्या  विविध ठेव योजनांमध्ये ठेवीदारांनी या ठेवी ठेवल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.  ए. बी. माने यांनी दिली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या पत्रकात पुढे म्हटले आहे, केडीसीसी बँकेने चालू आर्थिक वर्षात दहा हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट घेतले आहे.
दरम्यान, बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने बँक नेत्रदीपक अशा प्रगतीपथावर पोहोचवली आहे. दि.३१ मार्च २०२१ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाअखेर बँकेच्या ठेवी रु. ७१२८ कोटी व ढोबळ नफा रु.१४७ कोटी झाला आहे. सी. आर. ए. आर. १२.२५% व निव्वळ एनपीए २.३८% इतका आहे. बँकेचा संयुक्त व्यवसाय रु. ११,७०० कोटी झाला असून बँकेच्या सर्व म्हणजेच १९१ शाखा नफ्यात आहेत.
बँकेने दि. एक एप्रिलपासून शेती, साखर कारखाने, इतर संस्था व व्यक्तीगत कर्जावरील व्याजदरात मोठी कपात केली आहे. दरम्यान, ठेवींचे व्याजदर मात्र बँकेने स्थिर ठेवले आहेत. शेतकऱ्यांना शून्य % व्याजदराने म्हणजेच बिनव्याजी रुपये पाच लाखापर्यंतचे पीककर्ज देणारी महाराष्ट्र राज्यातील पहिली जिल्हा बँक आहे. बँकेकडून १००% कर्ज घेवून बँकेकडे १००% कारखाना बिले वर्ग करणाऱ्या पिक कर्जदारास २% रिबेट मिळणार आहे. शेतकऱ्यांचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास त्यास विमा संरक्षण देण्यासाठी लवकरच निविदा मागविणार असल्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments