Tuesday, July 1, 2025
spot_img
Homeताज्यागोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आम.प्रकाश अबीटकर यांचा शाहू आघाडीस पाठिंबा

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आम.प्रकाश अबीटकर यांचा शाहू आघाडीस पाठिंबा

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आम.प्रकाश अबीटकर यांचा शाहू आघाडीस पाठिंबा

कोल्हापूर/प्रतिनिधी : आमदार प्रकाश आबिटकर यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील व खासदार संजय मंडलिक यांचे प्रमुख उपस्थितीत श्री राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केला.गेले दोन तीन दिवस आम.अबीटकर हे कोणाच्या बाजूने जातात याबाबत चर्चा होत्या त्यांचा निर्णय हा गुलदस्त्यात होता आज मात्र त्यांनी शाहू आघाडीला पाठींबा दिला असून आता ही पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ भक्कम झाली आहे असे बोलले जात आहे.
यावेळी जेष्ठ नेते मारुतराव जाधव, बाबूराव आण्णा देसाई, गोकूळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, के.जी.नांदेकर, नंदकुमार ढेंगे, विश्वनाथ पाटील, शामराव भावके, दत्तात्रय उगले, कल्याणराव निकम, अरुण जाधव, अभिजीत तायशेटे, नंदकुमार सुर्यंवशी-सरकार, जितेंद्र टोपले, अशोक फराकटे, पांडूरंग पाटील पापा, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, माजी उपसभापती अजित देसाई, अशोक वारके, विलास पाटील, सभापती किर्तीताई देसाई, उपसभापती सुनिल निंबाळकर, मदनदादा देसाई, बी.डी.भोपळे, सुभाष पाटील-मालवेकर, तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, अशोक भांदीगरे, प्रविण नलवडे, संदीप वरंडेकर, सुर्याजी देसाई, संजय भाऊ सावंत, विक्रम पाटील, श्रीधर भोईटे, धैर्यशिल भोसले सरकार, धनाजी खोत, विजय बलुगडे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व ठरावधारक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments