केआयटीच्या वतीने पायोनियर २०२१ राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (स्वायत्त), कोल्हापूर ने १९९७ साली सुरु केलेल्या पायोनियर या राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धेचे २४ वे पर्व येत्या ४ व ५ एप्रिल २०२१ रोजी कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (स्वायत्त), कोल्हापूर येथे ऑफ व ऑनलाईन संपन्न होत आहे. दोन दिवस चालणा-या या स्पर्धेत मध्यवर्ती स्तरावर अभिव्यक्ती (संशोधन पेपर सादरीकरण) व प्रकल्प (प्रकल्प सादरीकरण) या दोन स्पर्धा ऑनलाईन होणार आहेत. तसेच सोबत विभागवार १० पेक्षा जास्त ऑनलाईन स्पर्धा होणार आहेत.
दि. ४ एप्रिल २०२१ रोजी होणा-या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. संजय कोठा, जॉईंट प्रेसिडंट अँड चीफ डिजीटल अॅण्ड बिझनेस ट्रान्स्फरमेशन, (अदानी एअरपोर्ट, अदानी पोर्टस अॅण्ड लॉजिस्टिक) अदानी ग्रुप, अहमदाबाद व सन्मानीय उपस्थिती म्हणून डॉ. रणजीत सावंत, इन्चार्ज चेअरमन, आयएसटीई, महाराष्ट्र गोवा विभाग हे उपस्थित राहणार आहेत.
अभिव्यक्ती या मध्यवर्ती संशोधन पेपर सादरीकरण स्पर्धेत आंतरशाखीय दृष्टीकोन अवलंबिला आहे. यातील निवडक पेपर हे कॉलेजच्या जर्नलमध्ये आयएसबीएन (क्ष्च्एग़्) नंबरसहित प्रकाशित केले जाणार आहेत. प्रकल्प या मध्यवर्ती प्रकल्प सादरीकरण स्पर्धा विभागवार वेगळी ठेवण्यात आली आहे.
पहिल्या दिवशी इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलि-कम्युनिकेशन विभागाकडून कोड ओ फिस्टा, कॉम्प्युटर सायन्स विभागाकडून द रॉयल सी, मेकॅनिकल विभागाकडून टेक्नोक्वीझ, पर्यावरणशारुा विभागाकडून इन्व्हीजन अशा पध्दतीने स्पर्धा पार पडणार आहेत.
दुस-या दिवशी जैवतंत्रज्ञान विभागाकडून टेक क्वीझ, स्थापत्य विभागाकडून कैझेन, इलेक्ट्रीकल विभागाकडून ब्रोन हंटर, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलि-कम्युनिकेशन विभागाकडून हायर्ड ऑर फायर्ड, कॉम्प्युटर सायन्स विभागाकडून जावा हेस्ट, मेकॅनिकल विभागाकडून इनइरा, पर्यावरणशारुा विभागाकडून इन्व्हीजन अशा पध्दतीने स्पर्धा पार पडणार आहेत.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारोपासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रतापसिंह देसाई, प्रेसिडंट आयएसटीई, नवी दिल्ली व सन्मानीय उपस्थिती म्हणून डॉ. प्रमोद पाटील, प्रो. व्हाइस चॅन्सलर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर हे उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेसाठी तब्बल रु. १,५०,०००/- रोख बक्षीसे, प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. या स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी विद्यार्थी व प्राध्यापक यांचे दोन महिन्यापासून जय्यत तयारी चालू आहे. या सर्व स्पर्धांच्या नोंदणीसाठी विद्याथ्र्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. जवळपास ७५० विद्यार्थी यामध्ये ऑनलाईन स्पर्धेसाठी स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत.
आयएसटीई (AICTE ) चे स्डुटंड चॅप्टर चेअरमन म्हणून दिविजा भिवटे हिची नियुक्ती केली आहे. स्पर्धेचे समन्वयक म्हणून श्री. ग्रंतेज ओतारी व सहसमन्वयक म्हणून श्री. अभिजीत पाटील काम पाहत आहेत. केआयटीचे चेअरमन श्री. भरत पाटील, व्हा. चेअरमन श्री. सुनिल कुलकर्णी, सेक्रेटरी श्री दिपक चौगुले व केआयटीचे विश्वस्त मान्यवर व संचालक डॉ. व्ही.व्ही.कार्जिन्नी, रजिस्ट्रार डॉ. एम. एम. मुजुमदार यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभत आहे.