Sunday, December 22, 2024
Home ताज्या घरफाळा सवलतयोजनेमध्ये आज १ कोटी ४ लाख कर वसूल आज सवलतीचा शेवटचा...

घरफाळा सवलतयोजनेमध्ये आज १ कोटी ४ लाख कर वसूल आज सवलतीचा शेवटचा दिवस

घरफाळा सवलतयोजनेमध्ये आज १ कोटी ४ लाख कर वसूल आज सवलतीचा शेवटचा दिवस

कोल्हापूर/प्रतिनिधी : महापालिकेच्याघरफाळा विभागाने शहरातील मिळकतकर थकबाकीदारांना थकबाकीचे दंडव्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीचीरक्कम एक रक्कमी भरणा केलेससवलत योजना सुरू केली होती. त्यासप्रतीसाद देत करदात्यांनी मंगळवार दि. ३० मार्च २०२१ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंतरुपये १ कोटी ४ लाख इतका कराचा भरणा केला असून आज अखेर एकूणरुपये ५७ कोटी ९५ लाख इतका करवसूल झाला आहे.
सदर योजनेचा बुधवार दि.३१ मार्च २०२१ रोजी अंतिम दिवस असून इथून पुढे सवलत योजनेचा लाभ घेता येणार नाही. तरी शहरातील करदाता मिळकतधारकांना सवलत योजनेचा लाभमिळणेकरीता आज रात्री १२ वाजेपर्यंत महानगरपालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्र सुरू राहणार असून त्याठीकाणी कराचा भरणा करून सवलत योजनेचा लाभ घेता येईल. त्याशिवाय ज्यांनाऑनलाईन कराचा भरणा करणे शक्यआहे त्यांनी आपला कर ऑनलाईन भरना करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासक कादंबरी बलकवडेयांनी केलेआहे.
तसेच जे थकबाकीदारमिळकतधारक आपले कराचा भरणाकरणार नाहीत त्यांचे मिळकतीवर १ एप्रिलपासून जप्ती व मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखी कठोर कारवाईसुध्दा करणेबाबतचे आदेश सर्व अधिकारी कर्मचारी यांना देणेत आलेले आहेत व अशी सवलत योजना भविष्यात पुन्हा राबविण्यात येणार नसलेबाबत स्पष्ट केले आहे. तेंव्हा जास्तीजास्त करदात्यांनी कराचा भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments