Sunday, December 22, 2024
Home ताज्या महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरेसा पुरवठा करण्यास केंद्राकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ नाना पटोले

महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरेसा पुरवठा करण्यास केंद्राकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ नाना पटोले

महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरेसा पुरवठा करण्यास केंद्राकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ नाना पटोले

मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक होत चालली. कोरोना महामारीच्या मोठ्या संकटातून महाराष्ट्र पुन्हा जात आहे. लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवणे गरजेचे आहे. सध्याच्या वेगानेच लसीकरण सुरु राहिले तर ते पूर्ण होण्यास १२ वर्ष लागतील. लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी लसींचा पुरवठाही त्याच प्रमाणात होणे गरजेचे आहे. परंतु देशात कोरोना रुग्ण वाढत असताना नरेंद्र मोदी हे पाकिस्तान व इतर देशांना लस पाठवत आहेत. कोरोनाचा सामना करताना केंद्र सरकारने मदतीचा हात देणे अपेक्षित असताना ते महाराष्ट्राला लस पुरवठा करण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटले यांनी म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की,  केंद्रात काँग्रेस सरकार असताना महामारीचा मुकाबला मोठ्या शिताफीने केला होता. बसस्टँडसारख्या सार्वजनिक ठिकाणी लसीकरण करण्यात आले होते. लसीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणात राबवल्याने त्यावेळी महामारीवर मात करण्यात यश आले पण सध्या केंद्रातील सरकार तसे करताना दिसत नाही. नागपूरमध्येही कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन प्रशासनाला योग्य त्या सुचना दिलेल्या आहेत. प्रशासनही त्यांचे काम करत आहे. नागपुरच्या आसपासच्या जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण तुलनेने कमी असताना नागपूरातच कोरोना रुग्ण संख्या कशी काय वाढू लागली असा प्रश्न उपस्थित करत पुलावामा स्फोटात वापरले गेलेले आरडीएक्स, अंबानी यांच्या घरासमोरील गाडीत सापडलेली स्फोटके आणि नागपूर कनेक्शन तसेच नागपुरात कोरोना का वाढतो याचे कनेक्शन काय आहे. अशी विचारणा त्यांनी केली.
रश्मी शुक्ला आणि परमवीरसिंह प्रकरणी बोलताना नाना पटोले म्हणाले की, अधिकाऱ्यांनी कोणत्याही पक्षाचे कठपुतळी बनू नये, त्यांनी जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम करावे. कोणत्यातरी पक्षाला समर्पित होऊन अधिकारी काम करु लागले तर ते लोकशाही तसेच प्रशासकीय व्यवस्थेलाही घातक आहे. देवेंद्र फडणवीस यांनी परमवीरसिंह व रश्मी शुक्ला प्रकरणी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. भाजपा व फडणवीस यांची खोटं बोल पण रेटून बोल, अशी भूमिका राहिली असून सुशांतसिंह प्रकरण असो वा परमवीरसिंह प्रकरण असो यातही त्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचेच काम केले आहे असेही पटोले म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments