Tuesday, July 1, 2025
spot_img
Homeताज्याउत्पादक ते ग्राहक थेट विक्री; ३० मार्चपर्यंत शाहू स्मारकमध्ये ‘कोल्हापूर द्राक्ष महोत्सव...

उत्पादक ते ग्राहक थेट विक्री; ३० मार्चपर्यंत शाहू स्मारकमध्ये ‘कोल्हापूर द्राक्ष महोत्सव २०२१’ चे उद्घाटन  

उत्पादक ते ग्राहक थेट विक्री; ३० मार्चपर्यंत शाहू स्मारकमध्ये ‘कोल्हापूर द्राक्ष महोत्सव २०२१’ चे उद्घाटन
 
कोल्हापूर/ (जिल्हा माहिती कार्यालय) : उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून ३० मार्चपर्यंत चालणाऱ्या कोल्हापूर द्राक्ष महोत्सव २०२१ चे उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याहस्ते आज झाले.
दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे ३० मार्चपर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ या कालावधीत हा महोत्सव चालणार आहे. जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी फित कापून या महोत्सवाचे आज उद्घाटन केले. यावेळी महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक सुभाष घुले, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, माजी उपसभापती जीवन पाटील आदी उपस्थित होते. जंबो सिडलेस खास आकर्षण
महोत्सवामध्ये ग्राहकांना अनुष्का, रेडग्लोब, सुपर सोनाक्का,माणिकचमण, कृष्णा सिडलेस, आर.के.सुपर, शरद सिडलेस आदी जातींची द्राक्षं आहेत. मिरज तालुक्यातील सोनी येथील दिलीप पाटील, प्रतिक लेंगरे या शेतकऱ्यांची जंबो सिडलेस ही द्राक्षं या महोत्सवाची खास आकर्षण ठरली. कोव्हिड-१९ मुळे शेतकरी वर्गात शेतमाल उत्पादन विक्रीबाबत चिंतेचे वातावरण होते.  विशेषत: द्राक्ष बागायतदारांची निर्यात ठप्प्‍ा होती. त्यामुळे  शेतकरी उत्पादकांच्या मालाची थेट ग्राहकांनी विक्री करण्याच्या उद्देशाने अशा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले, असे सांगून पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक श्री. घुले म्हणाले, गोवा येथेही द्राक्ष महोत्सव भरवण्यात आला होता. ग्राहकांना  तसेच शेतकऱ्यांना याचा चांगला लाभ मिळाला. कोल्हापूर येथील महोत्सवातही ग्राहकांनी भेट देवून सहभाग घ्यावा. निर्यातक्षम, चांगल्या प्रतीची द्राक्ष ग्राहकांना थेट उत्पादकांकडून मिळतील. त्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला आर्थिक लाभ होईल, असे आवाहनही त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments