Tuesday, July 1, 2025
spot_img
Homeताज्याश्रुती मोरे, अनिर मिश्रा, राघव समाणी : केआयटी एमयूएन २०२१ चे विजेते

श्रुती मोरे, अनिर मिश्रा, राघव समाणी : केआयटी एमयूएन २०२१ चे विजेते

श्रुती मोरे, अनिर मिश्रा, राघव समाणी : केआयटी एमयूएन २०२१ चे विजेते

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे अभियांत्रिकी महाविद्यालय (स्वायत्त), कोल्हापूर मधील वॉक विथ वर्ल्ड या विद्यार्थी समितीतर्फे सालाबादप्रमाणे केआयटी एमयूएन २०२१ या तीन दिवसीय स्पर्धेत श्रुती मोरे (वाय सी कॉलेजसातारा), अनिर मिश्रा (व्हीआयटी पुणे), राघव समाणी (संजय घोडावत,कोल्हापूर) आणि विराज माने (केआयटी,कोल्हापूर) यांनी प्रथम पारितोषिक पटकाविले. दि. १८ मार्च २०२१ रोजी अमेरिकेतील पाहिले मराठी महापौर श्री. हेमंत मराठे, महापौर, वेस्ट विन्ड्सर, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका यांच्याहस्ते केआयटी एमयूएन २०२१ व अभिग्यान २०२१ या सोहळयाचे उद्घाटन झाले. दि. १९ मार्च रोजी सकाळी झालेल्या दोन वाद विवाद सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी विविध देश व मंत्रीमंडळ यांचे मुद्दे मांडण्याचे काम बजावले व सायंकाळी सोशल्स हे कोवीड नियमांचे पालन करीत पार पडले. व २० मार्च २०२१ रोजी, वादविवाद सत्रानंतर संचालक डॉ. व्ही.व्ही.कार्जिन्नी, रजिस्ट्रार डॉ.एम.एम.मुजूमदार, डॉ. अक्षय थोरवत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या स्पर्धेमध्ये मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा शहरांतून ११० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. कोरोनोचा विचार करता या ११० विद्याथ्र्यांची प्रति वर्ग २० याप्रमाणे ६ वर्गांमध्ये विभागणी करुन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये विधानसभा, यूएनइपी, यूएनएचआरसी व आयपी या कमिटींचे आयोजन करण्यात आले होते व प्रत्येक कमिटीसाठी सोशल डिस्टसिंग, मास्क आणि सॅनिटायझर वापरणे, तसेच सुरक्षेचे हमीपत्र बंधनकारक होते. प्रत्येक सहभागी विद्याथ्र्याला प्रमाणपत्र देण्यात आले. विधानसभेसाठी श्रेयस मोहिते, युएनइपीसाठी ऐश्वर्या महाळे, युएनएचआरसीसाठी कोमल मेखला आणि आयपीसाठी प्रज्वल चौगुले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. केआयटी एमयूएन २०२१ साठी प्रेसिडंट शिवम हासुरकर, डिरेक्टर जनरल रणवीर पाटील, सेक्रेटरी जनरल शंभुराज पाटील यांनी काम पाहिले आणि प्रा. अमर टिकोळे व प्रा. प्रमोद पाटील यांनी समारंभाचे नियोजन केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी केआयटीचे अध्यक्ष श्री. भरत पाटील, उपाध्यक्ष श्री. सुनिल कुलकर्णी, सचिव श्री. दिपक चौगुले, संचालक डॉ. व्ही.व्ही.कार्जिन्नी, सर्व संचालक विश्वस्त, रजिस्ट्रार डॉ.एम.एम.मुजुमदार, डॉ. अक्षय थोरवत यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments