Saturday, December 21, 2024
Home ताज्या महापालिकेने पाणी पुरवठा प्रश्ना संदर्भात तातडीने श्वेत पत्रिका जाहीर करावी भाजपची मागणी

महापालिकेने पाणी पुरवठा प्रश्ना संदर्भात तातडीने श्वेत पत्रिका जाहीर करावी भाजपची मागणी

महापालिकेने पाणी पुरवठा प्रश्ना संदर्भात तातडीने श्वेत पत्रिका जाहीर करावी भाजपची मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरातील पाणीपुरवठ्याच्या दुरावस्थेसंदर्भात आज भाजपा शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली आणि कोल्हापूरच्या पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, पाण्याचा किती उपसा होतो आणि बिलिंग किती होते, सांडपाणी अधिभार जमा किती व त्या अधिभाराचा नेमका कोणत्या कोणत्या कारणा करीत व किती वापर झाला तसेच काळम्मा वाडी थेट पाईपलाईन योजनेची सद्यस्थिती आणि ती नेमकी पूर्ण कधी होणार या विषयांवर नागरिकांत समभ्रम असून महानगरपालिकेने या विषयाची श्वेतपत्रिका लवकरात लवकर प्रसिद्ध करावी अशी मागणी केली.
महानगरपालिकेची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना सर्व सामान्य नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या प्राथमिक गरजांच्या बाबतीत महापालिका प्रशासन अत्यंत तोकडे पडत आहे असे दिसून येते. स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठ्याच्या बाबतीत तर महापालिका प्रशासनाची अत्यंत दयनीय अवस्था आहे.
भाजपा सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी प्रस्तावना करताना शहातील पाण्याच्या व्यवस्थे बाबतची सद्यस्थिती विषद केली. कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना झाल्या नंतर बालिंगा उपसा केंद्रातून कोल्हापूरकरांची तहान भागवली जात होती त्यांनतर १९९५ साली शिंगणापूर योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले. आज पर्यंत या दोन्ही योजनांच्या माध्यमातून अपुऱ्या दाबाने संपूर्ण कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा केला जातो. उपसा केलेल्या पाण्यातून रोज ४ लाख लिटर पाणी गळती द्वारे वाहून जाते परंतु पाणी पुरवठा विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याचे याकडे लक्ष नसल्याचे नमूद केले. कोल्हापूर शहरातील ड्रेनेज लाइन व पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाइन बदलण्यासाठी पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अमृत योजने अंतर्गत १७० कोटीचा निधी मंजूर केला तरी देखील अजूनही वर उपस्थित केलेले प्रश्न का प्रलंबित आहेत याचा विचार होणे गरजेचे असल्याचे सांगतले.
माजी नगरसेवक अजित ठाणेकर म्हणाले, २०१२ साली मंजूर झालेली काळंम्मावाडी थेट पाईप लाईनेचे काम अतीशय धीम्या गतीने हे काम चालू असून थेट पाईपलाईन योजना पूर्ण होणार की नाही याबाबत साशंकता आहे. कोल्हापूर महानगरपालिका जलव्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी शहरामध्ये तयार होणाऱ्या सांड पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पाण्याच्या बीलामध्ये “सांडपाणी अधिभार कर” लावला परंतु यातून शहर वासियांच्या खिशातून किती रुपये घेतले व किती ठिकाणी या सांडपाण्यावर प्रकिया करणारे प्रकल्प उभारले गेले याची कोणती माहिती आहे असा सवाल उपस्थित केला. तसेच काही अधिकारी, कर्मचारी व माजी लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने शहरात शेकडोंच्या संख्येने बिनमिटरची कनेक्शन असून ती प्रशासनाने तातडीने शोधावीत असे सांगितले.
संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांनी, बालिंगा आणि शिंगणापूर पंपांमध्ये होणारी नादुरुस्ती त्यातून कोल्हापूर शहराला प्रत्येक महिन्याला एक ते तीन दिवस पाणी पुरवठा बंद अशी स्थिती निर्माण होत असताना प्रशासन बघ्याची भूमिका का घेते ? हा अनुत्तरीत प्रश्न आहे असे नमूद केले.
भाजपा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे यांनी मागील काही वर्षांची पूरस्थिती पाहता पिण्याच्या पाण्याची कमतरता होऊ नये पावसाळा सुरु होण्यापूर्वी पंपिंग स्टेशनबाबतीत व इतर गोष्टींची तयारी करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, महानगरपालिका प्रशासन पाणी पट्टी दरामध्ये वाढ करण्याच्या विचारात असून पाणी गळती, पाणी चोरी, वर्षानुवर्षे थकवलेली पाणी पट्टी वसूल करणे, बेकायदा उपसा यावर सक्षम प्रशासक म्हणून आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना करून सक्षम अधिकारी आणि मायक्रो व्यवस्थापनाच्या माध्यमातून सध्याच्या परिस्थितीमध्ये शहरामध्ये पाणी पट्टी वाढ करण्यापेक्षा पाणी गळतीचे प्रमाण शून्य टक्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत यामुळे महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग ना नफा ना तोटा तत्वावर चालवता येऊ शकतो. त्यामुळे वर उपस्थित केलेले सर्व प्रश्न कोल्हापूर शहरातील सर्व सामान्य नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील व दैनंदीन गोष्टीचा भाग आहेत त्यामुळे यासर्व उपरोक्त विषयांना अनुसरून कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने पाणी पुरवठा या प्रश्ना संदर्भात तातडीने श्वेत पत्रिका जाहीर करावी अशी मागणी भाजपाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केली.
शिष्टमंडळाला उत्तर देताना प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी, सदर निवेदनाचा गांभीर्याने विचार करून वरील मुद्यांच्या आधारे लवकरात लवकर यावर कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
याप्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, उपाध्यक्ष संजय सावंत, अमोल पालोजी, राजू मोरे, चिटणीस तौफिक बागवान, दिग्विजय कालेकर, महिला अध्यक्षा गायत्री राउत, विवेक कुलकर्णी, आशिष कपडेकर, अतुल चव्हाण आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments