बिंबा या थरारक वेब सिरीजचे शूटिंग गगनबावड्यात पूर्ण
कोल्हापूर/प्रतिनिधी : सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेबसिरीज प्रदर्शित होत आहेत. या अंतर्गत पिंग पॉग या एंटरटेनमेंट चॅनलच्या वतीने बिंबा या वेबसिरीजची निर्मिती करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात या वेबसिरीजचे शूटिंग पूर्ण झाले असून ३१ मार्चला हे शूटिंग संपणार आहे. ही वेब सीरीज प्रणय भय थरार अशा विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणार असून त्यामुळे रसिक प्रेक्षक या वेबसाईटला मोठी पसंती देतील असा विश्वास वेब सिरीजचे दिग्दर्शक मिलिंद सकपाळ आणि निर्माते जीवन जाधव भरत कालीटा यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.ही वेबसिरीस मे महिन्यात प्रदर्शित होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबईच्या कामरूपा क्रिएशनच्या वतीने बिंबा ही वेबसिरीज बनविण्यात येत आहे.या वेबसिरीजचे शूटिंग ८ मार्चला गगनबावडा याठिकाणी सुरू करण्यात आले होते. सध्या बहुतांश शूटिंग पूर्ण झाले असून ३१ मार्चला गगनबावडा मधील शूटिंगचा समारोप होणार आहे. बालगंधर्व, हॅप्पीजर्नी, कच्चा लिंबू, महिमा खंडोबाचा, राजा शिवछत्रपती आणि स्वराज्य रक्षक संभाजी या चित्रपट आणि मालिकांमध्ये सह दिग्दर्शकाची भूमिका ही मिलिंद सकपाळ यांनी बजावली आहे.तर लेखन राहुल डोरले यांनी केली असून प्रसिद्ध नायक अनिकेत विश्वासराव आणि युविका चौधरी यांच्या सिरीजमध्ये प्रमुख भूमिका आहेत शिवाय राहुल सिंग हे विशेष भूमिकेत आहेत.शूटिंग निशांत भागवत यांनी केले असून ही सिरीज एका मानसिक विकृत तरुणाच्या कारनाम्यावर आधारीत आहे.पत्रकार परिषदेला कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.