अमृत योजनेअंतर्गत कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालय ते सर्किट हाऊस, सायबर चौक ते लकी बझार व कसबा बावडा जलशुध्दीकरण केंद्र ते गोळीबार मैदान रस्ता ४५ दिवस वाहतूकीसाठी बंद
कोल्हापूर/प्रतिनिधी : केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय ते सर्किट हाऊस, सायबर चौक ते लकी बझार व कसबा बावडा जलशुध्दीकरण केंद्र ते गोळीबार मैदान या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. हे काम मंगळवार, दि १६ मार्च २०२१ पासून सुरू करण्यात आले आहे. सदरचे काम ४५ दिवस सुरू रहाणार आहे. त्यामुळे सदर रस्त्यावर टाकाव्या लागणा-या पाईपलाईनचा व्यास मोठा असलेने कामासाठी रस्ता पुर्णत: बंद करणे आवश्यक आहे. या कामाच्या ठिकाणच्या रस्त्यावरील दैनंदिन वाहतुक बंद राहणार असलेने शहर वाहतूक शाखेच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी खबरदारीची उपाययोजना म्हणून पर्यायी मार्गाने वळविणेत आली आहे. तरी संबंधीत सर्व नागरीकांनी या कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.